बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

कॅगचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव


प्रशासकीय आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने
कॅगची कामगिरी उत्कृष्ट : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 16 : प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा वचक राहून शासकीय निधीतील प्रत्येक रुपयाचा विनियोग योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने कॅगने आतापर्यंत बजावलेली कामगिरी उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
        कम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) (भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक) या केंद्र सरकारच्या आस्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात श्री. चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधीमंडळाच्या लोक लेखा समितीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट  आमदार ॲनी शेखर उपस्थित होत्या. कार्यक्रमाला मुख्य लेखा परिक्षक माला सिन्हा, सुषमा दाबक, मिनाक्षी मिश्रा उपस्थित होत्या.
        आपण केंद्रात असताना संसदेच्या लोक लेखा समितीचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्या काळात झालेल्या सार्क राष्ट्रांच्या परिषदेत आपल्या सर्व शेजारी राष्ट्रांनी कॅगच्या कामकाजाबाबत खुप उत्सुकता दाखवुन मार्गदर्शनाची अपेक्षा केली होती, अशी आठवण श्री. चव्हाण यांनी सांगितली. ते म्हणाले की, दीडशे वर्षे हा एखाद्या संस्थेच्या वाटचालीतील फार मोठा टप्पा आहे. या संस्थेची स्थापना ब्रिटीश काळात 1860 साली त्यावेळी तिचा उद्देश व्यवहारातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नीतीपूर्ण आचरण हीच होती. दीड शतकानंतरही या संस्थेने आपल्या नि:पक्षपाती आणि चोख कामामुळे शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवरही आर्थिक धाकाचा सुयोग्य अंकुश राखला आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये अशा नियंत्रक संस्थांचे महत्व फार मोठे आहे. कॅगने बदलत्या काळाबरोबर आवश्यक ते बदल केल्यामुळे ही संस्था कधीही कालबाह्य झाली नाही आणि तिच्या महत्वपूर्ण उपयुक्ततेमुळे होण्याचीही शक्यता नाही.
        विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनीही कॅगच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले की, उत्तरदायित्व ही मोठी गोष्ट आहे. शासनाचा निधी हा सर्वसामान्य नागरिकाचा निधी आहे. त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होण्यासाठी तो खर्च करणाऱ्यामध्ये उत्तरदायित्वाची भावना असणे आवश्यक आहे. कॅगच्या लेखापरिक्षण पद्धतीमुळे निधी खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये अशा प्रकारचे उत्तरदायित्व तयार होते.
        विधीमंडळाच्या लोक लेखा समितीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट यांनीही कॅगच्या कार्याबाबत आपले अनुभव मनमोकळेपणे सांगितले. समितीमधील अनेक आमदार सदस्य ग्रामीण भागातील असल्याने भाषिक समस्या निर्माण होते, यासाठी कॅगच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक भाषा शिकावी. म्हणजे हे काम अधिक परिणामकारकपणे करता येईल, असे ते म्हणाले.
0000000000000000000000000000000000

        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा