रविवार, २ ऑक्टोबर, २०११

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली
मुंबई, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयाजवळील त्यांच्या पुतळ्याला आज मुख्यमंत्री पृध्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री  अजित पवार, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. 
याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व नागरीक उपस्थित होते. जयंतीनिमित्त महात्मा गांधी स्मारक समितीच्या वतीने येथे सर्व धर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. 
000000
महात्मा गांधी जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
     मुंबई दि: 2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  जयंती  निमित्तआज विधान भवनात विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा सदस्य  मधु चव्हाण, श्रीमती ॲनी शेखर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
     याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सहसचिव  भाऊसाहेब कांबळे,  यु. के. चव्हाण, विधानमंडळ सचिवालयाचे माजी प्रधान सचिव  विलास पाटील, उपसचिव  महेंद्र काज,  सुभाषचंद्र मयेकर,  विलास आठवले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस  पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन  आदरांजली वाहीली.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा