मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०११

गिरणी कामगारांच्या वारसांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही


निधन पावलेल्या गिरणी कामगारांच्या
वारसांकडूनही अर्ज मागवावेत : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 4 : गृहनिर्माण सचिव म्हाडा यांनी 10 दिवसांच्या आत जाहिरात द्यावी आणि निधन पावलेल्या गिरणी कामगारांच्या वारसांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही करावी, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.
 विधिमंडळाच्या मागील (पावसाळी) अधिवेशनामध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा आणि विधानपरिषद पक्षीय गट नेते गिरणी कामगारांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांची आज दि. 4 ऑक्टोबर, 2011 रोजी बैठक बोलाविण्यात आली होती.  निधन पावलेल्या गिरणी कामगारांच्या वारसांकडून अर्ज मागवावेत किंवा कसे, याबद्दल या बैठकीमध्ये गिरणी कामगारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींचे मत जाणून घेण्यात आले. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने  मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत की,  गृहनिर्माण सचिव म्हाडा यांनी 10 दिवसाच्या आत जाहिरात देऊन मृत गिरणी कामगारांच्या वारसांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही करावी. 
तसेच,  त्यातील ज्या गिरणी कामगारांना यापूर्वी अर्ज करणे शक्य झाले नव्हते,  त्या शिल्लक राहिलेल्या गिरणी कामगारांना देखील  या निमित्ताने अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. या विषयी पूर्वी घेतलेल्या निर्णयामध्ये कोणताही बदल शासनाने केलेला नाही त्यामुळे  गिरणी कामगारांची कोणतीही फसवणूक करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सचिवालयाने केले आहे.
--------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा