अमरावतीजवळील अपघातातील मृतांच्या
वारसांना मुख्यमंत्री निधीतून मदत
मुंबई, दि. 22 : अमरावती-नागपूर महामार्गावरील गुरूकुंज मोझरी नजिक बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
बुधवारी सायंकाळी अमरावतीजवळ भरधाव ट्रकने टाटा सुमोला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सुमोमधील ठार झाले. त्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत देण्यात येणार आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.