शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११

सादरीकरण



समुद्रात भराव घालून नवीन भूमी
निर्माण करणे ही फक्त शक्यताच
                                    - मुख्यमंत्री
मुंबई, दि.23: मुंबईमध्ये विस्तारासाठी अजिबात जागा उपलब्ध नसल्याने नवीन जागा शोधणे आवश्यक आहे. मात्र किनारपट्टी नियमन कायदा व पर्यावरणविषयक कडक कायद्यांमुळे समुद्रात भराव घालून नवीन भूमी  निर्माण करण्याचा उपाय ही सध्यातरी फक्त शक्यताच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
            समुद्रात भराव घालून जमीन उपलब्ध होऊ शकते, याबाबतचे सादरीकरण नेदरलँडचे या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. रोनाल्ड वॉटरमन यांनी आज  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत केले. त्यानंतर श्री. चव्हाण बोलत होते.
            या  सादरीकरणात  प्रामुख्याने  मुंबईतील   गेटवे,  मरीनड्राईव्ह,  मलबार हिल, माहिम, जे. एन. पी. टी व रेवस येथील समुद्र किनारे कशाप्रकारे विकसित करता येतील, तसेच युरोप मधील देशांप्रमाणे पर्यावरणाची जोपासना करीत समुद्रात नवीन जमीन तयार करणे शक्य आहे याबाबत विस्तृत माहिती विशद करण्यात आली.
            मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, सध्यातरी या विषयाकडे केवळ एक शक्यता म्हणून पहावे लागेल यावेळी नेदरलँडच्या भारतातील वाणिज्य दूत श्रीमती एम. ए. वॅन ड्रुनेन लिटल, मुंबई फर्स्टचे अध्यक्ष नरिंदर नायर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुंबई महानगर आयुक्त राहूल अस्थाना, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव टी. सी. बेंजामिन, पर्यावरण सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह उपस्थित होते.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा