गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

शौचालय वापर प्रमाणपत्र देण्यास वर्षाची मुदत


जि.प.,पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायत सदस्यांना
    शौचालय वाप प्रमाणपत्र देण्यास वर्षाची मुदत
   मुंबई, दि. 29 :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाच्या वापराचे प्रमाणपत्र सादर करण्याचा नव्वद दिवस हा कालावधी एक वर्ष करण्याची सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापुर्वीच घेतला आहे. हा निर्णय जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांनाही लागु आहे. हा निर्णय कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांसदर्भात आहे, याबद्दल अनेक स्तरावर विचारणा होत असल्याने ही बाब स्पष्ट करण्यात येत आहे.
            महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 16 मधील पोटकलम-1 च्या खंड (त) मध्ये तसेच ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 च्या पोट कलम 1 मधील खंड (ञ-5) मध्ये नव्वद दिवस या शब्दाऐवजी एक वर्ष हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत.  पूर्वीच्या नव्वद दिवसांच्या तरतुदीनुसार ज्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.  त्यांना अपात्र मानण्यात येऊ नये अशीही तरतूद करण्यात आली आहे.  शौचालयाचा वापर करण्याबाबतचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा हा कालावधी आहे.
या निर्णयामुळे शौचालयाचा वापर करण्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यास संबंधित सदस्यांना आणखी कालावधी उपलब्ध होईल.  तसेच पूर्वीच्या तरतुदीनुसार जे सदस्य अपात्र ठरले होते ते सदस्य अन्य कारणास्तव अपात्र नसल्यास त्यांचे सदस्यत्व अबाधित राहील.
----0----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: