आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल - मुख्यमंत्री
औरंगाबाद, दि. 19 : ब्रिटिशांविरुध्द दिलेल्या लढ्यापेक्षा मराठवाड्यातील जनतेने अन्यायकारी निजामाविरुध्द दिलेला लढा अधिक तीव्र स्वरुपाचा व कठीण होता.मराठवाडा स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोशातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
मराठवाडा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद येथे ''मराठवाडा स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोशा '' चे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी उपस्थित होते.
मराठवाडा स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोशात मराठवाड्यातील एकूण 5 हजार पेक्षा जास्त स्वातंत्र्यसैनिकांचे संक्षिप्त चरित्र प्रकाशित करण्यात आले असून हा ग्रंथ दर्शनिका विभागाच्यावतीने पुर्नमुद्रित करण्यात आला असून 460पृष्ठसंख्येचा ग्रंथ 320रुपयाला सर्व शासकीय मुद्रणालयातून विक्रीसाठी उपलब्ध आहे.
0000
गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी
डॉ.व्ही.एस.ऐंचवार यांची नियुक्ती
मुंबई, दि. 19 : आदिवासी बहूल जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करुन घेण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केली आहे. या विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरुपदी डॉ. व्ही. एस. ऐंचवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या पुरोगामी धोरणांची अंमलबजावणी तसेच विद्यापीठाच्या उद्दिष्टांची पुर्तता करण्यासाठी,आर्थिक व सामाजिकदृष्ट्या न्याय देण्यासाठी त्याचप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीकोनातून डॉ. व्ही. एस. ऐंचवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा