जागतिक समस्या, दहशतवाद, राजकीय आव्हानांना
सामोरे जात राज्याचा समतोल विकास साधणार : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 18 : जागतिक समस्या, दहशतवाद व राजकीय आव्हानांना सामोरे जात राज्याचा समतोल विकास साधला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे केले.
जायन्ट इंटरनॅशनलचा 39 वा वर्धापन दिन काल हॉटेल ट्रायडन्ट येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, जायन्ट इंटरनॅशनलचे अध्यक्ष नाना चुडासामा, श्रीमती मुनिरा चुडासामा, इंग्लंडच्या संसदेचे सदस्य लॉर्ड गुलामनुन, सायना एन्फी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशापुढे अनेक आव्हाने आहेत. नैसर्गिक साधन सामग्रीची कमतरता असली तरी देशात प्रशिक्षित मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंता, संगणक तज्ज्ञ आदींना परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे सर्व समस्या दूर करुन आपणास विकास साधावयाचा आहे. मात्र हा विकास सामाजिक, भौगोलिक, आर्थिक क्षेत्रात समतोल होणे गरजेचे आहे.
नाना चुडासामा यांच्या सामाजिक योगदानाची प्रशंसा करुन मुख्यमंत्री म्हणाले की, चुडासामा यांच्या अध्यक्षतेखाली जायन्ट इंटरनॅशनलची अधिकअधिक प्रगती झाली असून नवीन सामाजिक कार्ये त्यांनी सुरु केली आहेत. या संस्थेला जागतिक मानही मिळालेला आहे. यन्ट इंटरनॅशनलच्या आजच्या स्थापना दिनी गौरविण्यात आलेले विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर हे त्यांच्या क्षेत्रात अद्वितीय आहेत. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरेल. असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी डॉ. सुभाष दलाल (औषधे) रॉनी स्क्रूवाला (व्यवसाय व उद्योग), वाय. के. सप्रो (सामाजिक कार्य), फरहान अख्तर (चित्रपट) विक्रम चंद्रा (इलेक्ट्रॉनिक माध्यम), डॉ. नरेश चंद्रा (शैक्षणिक प्रशासन) डॉ. क्रिती नारायण (शिक्षण) यांना आपापल्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. सुप्रसिध्द स्व. गौतम राजाध्यक्ष यांचा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या भगिनी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शोभा डे यांनी स्वीकारला.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा