मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नागपुरात आगमन
नागपूर, दि 16 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आज डॉ. बाबासाहेब आबंडेकर आंतराष्ट्रीय विमानतळावर विमानाने मुंबईहून येथे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. यावेळी त्यांचे समवेत वनमंत्री डॉ. पंतगराव कदम, वन विभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी होते. विमानतळावर पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक आदींनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी प्रभारी विभागीय आयुक्त प्रविण दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र सिंग, पोलीस आयुक्त डॉ. अकुंश धनविजय, जिल्हाधिकारी सौरभ राव, जि.प.अध्यक्ष सुरेश भोयर, जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी अमित सैनी, आमदार सर्वश्री दिलीप पारवेकर, वामनराव कासावार, दिनानाथ पडोळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, श्रीमती सुनीता गावंडे, माजी मंत्री अनिस अहमद, तसेच जयप्रकाश गुप्ता व अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा