शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

साहित्य अकादमी पुरस्कार
जयंत नारळीकर यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
नागपूर, दि. 19 : राष्ट्रीय स्तरावरील साहित्यातील प्रतिष्ठीत साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना घोषित झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जयंत नारळीकर यांनी सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख आणि त्यानंतर पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. त्यांच्या 'चार नगरातले माझे विश्व' या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यामुळे एका शास्त्रज्ञ साहित्यिकाचा गौरव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कोकणी भाषेतील ‘मंथन’ या लेखसंग्रहासाठी माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही अभिनंदन केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा