मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या कर्करोग निदान केंद्राचे लोकार्पण
मुंबई, दि. 13 :
श्री सुभाषचंद्र रूणवाल एज्युकेशन फाऊंडेशन पुरस्कृत व अखिल भारतीय मारवाडी युवा
मंच यांच्या वतीने कॅन्सरमुक्त भारत या
उद्दीष्टपुर्तीसाठी सर्वसुविधांनी सज्ज असलेल्या मोबाईल कॅन्सर डायग्नोसिस सेंटरचे
आज वर्षा निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून
लोकार्पण करण्यात आले.
देशभरात
कॅन्सरच्या रूग्णाची संख्या वाढत असून कॅन्सरच्या मोफत तपासणीसाठी हे वाहन आजपासून
देशभरातील महाराष्ट्रासह आसाम, मेघालय, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या सहा
राज्यात प्रवास करेल. या वाहनामध्ये कॅन्सरच्या संपूर्णपणे निदान करणाऱ्या
अत्याधुनिक चाचण्यांची सुविधा आहे. कॅनडामधील प्रयोगशाळेतून निदानानंतर थेट
मार्गदर्शन मिळवून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या
लोकार्पण सोहळ्याला उद्योगमंत्री प्रकाश मेहता, रूणवाल एज्युकेशन फाऊंडेशनचे
अध्यक्ष सुभाष रूणवाल, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष ललीत गांधी, चंदा रूणवाल, संदीप
रूणवाल, सुबोध रूणवाल, सुरुची पोद्दार, निकेश गुप्ता, सुनिल खाबीया आदी उपस्थित
होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा