क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत यांच्या
निधनामुळे मुख्यमंत्र्यांना दुःख
मुंबई
दिः १३ : ज्येष्ठ
पत्रकार व क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत निधनामुळे आपल्या लेखणीतून देशी खेळांना लोकप्रियता मिळवून देणारा पत्रकार
हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस
यांनी व्यक्त केली आहे.
श्री संत यांनी क्रीडा पत्रकारिता हे व्रत मानले आणि या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण
केले असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ क्रिकेटच नव्हे तर कबड्डी सारख्या देशी खेळांकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही. क्रीडा संघटनांमध्ये
विविध जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. त्यांच्या
आकस्मिक निधनाने क्रीडा पत्रकारितेचे नुकसानच झाले आहे अशा शब्दात
मुख्यमंत्र्यांनी श्री संत यांना श्रध्दांजली अर्पण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा