मुंबईला “स्मार्ट सिटी” बनविण्यासाठी
एकत्रितपणे काम करू -मुख्यमंत्री
मुंबईतील गरीब
नागरिकांना घर देण्यासोबतच मुंबईला “स्मार्ट सिटी” बनविण्यासाठी
एकत्रितपणे काम करू, असेप्रतिपादनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
गोरेगाव येथील बॉम्बे
एक्झिबिशन सेंटर येथे ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ च्या वतीने आयोजित‘अेसटेक 2014’ चे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी
प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, हाफिज कॉन्ट्रॅक्टर, क्रिस बब, आशिष
रहेजा, कैवान मेहता, सर क्लाउडीओ बेलनी, अरूणजोत सिंग, व्ही. श्रीनिवासन, रमेश
नायर, बोमन ईराणी, कमल खेतान, सुसाने खानयांच्यासह देशभरातील आर्किटेक्ट व बिल्डर्स
उपस्थित होते.
मुंबईतील गरीब
नागरिकांना घर मिळावे, यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी काम करावे, असे सांगून
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील ज्या गरीब नागरिकांना घर नाही अशा नागरिकांना घरेउपलब्ध
करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करा, यासाठी शासनाकडून बांधकामपरवाने देण्यास विलंब
होणार नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परवाने देण्यात
येतील.
केंद्र शासनाने आखलेल्या
धोरणांची राज्यातही अंमलबजावणीकरण्यात येणार असून केंद्र व राज्य सरकार राज्याच्या
विकासासाठीएकत्रितपणे काम करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. देशभरातील
बिल्डर्स व आर्किटेक्ट यांचा सहभाग तसेच 500 स्टॉल्स असलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी
खुले असून सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत चार दिवस हे प्रदर्शन पाहता
येईल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा