बी.ए.जी. फिल्मस् एज्युकेशन सोसायटी भूखंड सरकारला परत करणार
मुंबई,
दि. 7 : बी.ए.जी. फिल्मस् एज्युकेशन सोसायटीला राज्य सरकारने शैक्षणिक संकुल
उभारण्यासाठी अंधेरी मधील आंबोली येथे दिलेला भूखंड सरकारला परत घेण्याची विनंती
केली आहे. या संदर्भात संस्थेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिले
आहे.
या
पत्रात असे म्हटले आहे की, आपली संस्था देशात अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था
चालविते. महाराष्ट्रात अशा प्रकारचे शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी संस्थेने 2007
साली राज्य सरकारकडे भूखंड मिळण्यासाठी अर्ज केला होता. राज्य शासनाच्या
धोरणानुसार शैक्षणिक उद्देशासाठी राखीव असलेला आंबोली येथील भूखंड क्रीडांगणासह
वार्षिक भाडेतत्त्वावर 15 वर्षांसाठी लिजवर दिला होता. राज्य शासनाने निश्चित
केलेल्या दरानुसार संस्थेने शासनाकडे आवश्यक ती रक्कम भाड्यापोटी जमा केली आहे. तसेच
याबाबतचा करार करून योग्य ते मुद्रांक शुल्कही शासनाला जमा केली होते. हा भूखंड
परत घेण्याबद्दलची कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा