विनय आपटे यांच्या निधनामुळे
रसिक
विनयशील कलावंताला अंतरले :
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 7 : दूरचित्रवाहिनी, मराठी आणि हिंदी
चित्रपट, रंगभूमी अशा सर्व क्षेत्रांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
विनय आपटे यांच्या निधनामुळे रसिक एका विनयशील आणि प्रतिभावंत कलावंताला अंतरले
आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
श्री. चव्हाण यांनी
शोकसंदेशात म्हटले आहे की, श्री. आपटे यांनी दूरचित्रवाहिनी, नाटक आणि सिनेमा
या तीनही माध्यमांमध्ये अतिशय समर्थपणे काम केले. या तिन्ही माध्यमांच्या ताकदीची
त्यांना अचुक जाण होती. त्यांनी अनेक नाटके आणि टीव्ही मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मिती
केली होती. 'आभाळमाया' ही त्यांनी दिग्दर्शित केलेली मालिका घराघरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. अत्यंत
समजूतदार आणि संयत अभिनयासाठी ते ओळखले जायचे. अमाप लोकप्रियता आणि अभिनयाची देणगी
लाभूनही श्री. आपटे यांनी यश कधीही डोक्यात जाऊ दिले नाही. सोज्वळ आणि विनयशील
व्यक्तिमत्व हा त्यांचा मोठा गुण होता. त्यांच्या निधनामुळे प्रत्येक मराठी रसिक
हळहळला आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
-------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा