अजिंठा येथील भव्य अभ्यागत केंद्राचे उदघाटन
औरंगाबाद, दि.16 --
महाराष्ट्र राज्य पर्यटन
महामंडळाच्यावतीने अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या अभ्यागत
केंद्राचे उदघाटन केंद्रीय पर्यटन
राज्यमंत्री डॉ. के. चिरंजीवी
यांच्याहस्ते आज दुपारी झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन
भुजबळ, औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र
दर्डा, खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दूल सत्तार, आमदार
सुभाष झांबड यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच जपानचे कौन्सिल जनरल
कियोशी असाको आणि त्यांचे सहकारी तसेच
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सुमित मलिक, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय
संचालक डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्यासह वरिष्ठ
शासकीय अधिकारी उपस्थित होते.
हे अद्यावत अभ्यागत केंद्र 17 हजार 936
चौ.मी. परिसरात उभारण्यात आले आहे. त्यात अजिंठा लेण्यातील लेणी क्रमांक 1 ,2,16
आणि 17 या लेण्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून त्यासाठी खास तंत्रज्ञानाचा
वापर करण्यात आला आहे. येथे पर्यटकांसाठी ग्रंथालय, लेणी परिसराची माहिती देणाऱ्या
दृकश्राव्य फिती पाहण्याची सुविधा ॲम्फि
थेटर , उपहारगृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. केंद्रात अजिंठा
लेण्यांचा इतिहास तसेच त्यामागील तत्वज्ञान यांची माहिती देणारे चित्रफलक तसेच
लेण्यातील विविध मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. या केंद्रासाठी जपानच्या इंटरनॅशनल कोऑपरेशन
एजन्सीने भरीव मदत केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा