विधानसभेतील आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी केली पूर्तता
भाडे
तत्वावरील घरे योजनेखालील ५० टक्क्यांपर्यंत
घरे संक्रमण
निवासस्थाने म्हणुन वापरणार
मुंबई, दि. 21 : भाडे तत्वावरील घरे योजनेखाली मुंबई
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध
होणा-या सदनिकांपैकी 50 टक्केपर्यंत सदनिका प्राधान्याने संक्रमण निवासस्थान
म्हणून वापरण्याचा तत्वत: निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.
यासंदर्भात कार्यपध्दती विहित करण्यासंबंधी मुंबई
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या
महानगर आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी विधानसभेत यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात दि. २६ जुलै रोजी याबाबत
आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय
घेण्यात आला आहे. भाडे तत्वावरील घरे योजनेअंतर्गत काही घरे मुंबई महानगर
प्रदेश विकास प्राधिकरणाकडे उपलब्ध होतात.
त्यापैकी काही घरे मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका क्षेत्रात धोकादायक व
मोडकळीस आलेल्या इमारती निष्कासित करतांना विस्थापित होत असलेल्या रहिवाशांना
तूर्तास सक्रंमण निवास म्हणून उपलब्ध करुन देण्यात येतील.
मुंबई महानगर प्रदेशातील
महानगरपालिका हददीतील अशा सदनिका या उपलब्धतेनुसार अतिधोकादायक, धोकादायक व
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनासाठी संबंधित महानगरपालिकेला संक्रमण
निवासासाठी देण्यात येतील.
जर महानगरपालिका
क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींच्या निष्कासनाच्या कार्यवाहीअंतर्गत
निष्कासनानंतर संक्रमण निवासस्थाने महानगरपालिकेकडे उपलब्ध नसतील तर महानगरपालिका
आयुक्तांच्या विनंतीवरून त्या महानगरपालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास
प्राधिकरणाकडील भाडेतत्वावरील प्राप्त होणा-या सदनिका उपलब्धतेनुसार संक्रमण
निवास म्हणून वापरण्यासाठी संबंधित
महानगरपालिका आयुक्तांच्या ताब्यात देण्यात येतील.
मुंबई महानगर प्रदेश
विकास प्राधिकरणाकडून या सदनिका रु.1/- प्रति चौ.मी. एवढया नाममात्र भाडयाने 30
वर्षांकरीता संबंधित आयुक्त, महानगरपालिका यांना भाडेतत्वावर देण्यात येतील. संबंधित आयुक्त, महानगरपालिका
यांना या सदनिका अतिधोकादायक/ धोकादायक व
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सदनिकाधारकांच्या तात्पुरत्या निवा-यासाठी संक्रमण निवास
म्हणून भाडे तत्वावर देण्याकरीता वापरता येतील. या सदनिकांचे भाडे संबंधित
आयुक्त, महानगरपालिका निश्चित करतील. हे भाडे
आयुक्त, महानगरपालिका यांनी वसुल करुन
त्यातून प्राप्त होणा-या रक्कमेतून सदर इमारतींची देखभाल व दुरुस्ती करावयाची आहे.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा