स्व.नाईक यांचे दिशादर्शक कार्य सर्वांपर्यंत
पोहोचण्यासाठी ‘वसंत वैभव’ उपयुक्त - मुख्यमंत्री
पोहोचण्यासाठी ‘वसंत वैभव’ उपयुक्त - मुख्यमंत्री
मुंबई,
दि. 31 : नागरी आणि ग्रामीण विकासाचा उत्तम समन्वय ठेवणारे माजी मुख्यमंत्री
स्व. वसंतराव नाईक यांचे कार्य दिशादर्शक असल्याने आजच्या पिढीसमोर त्यांचा आदर्श उभा राहण्यासाठी ‘वसंत वैभव’ हे छायाचित्र प्रदर्शन अतिशय उपयुक्त ठरणार आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

स्व.
वसंतराव नाईक यांना ‘शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री’ म्हणुन ओळखले जाते. प्रत्यक्ष
शेतामध्ये राबणारे वसंतराव हरितक्रांतीचे आणि धवलक्रांतीचे जनक होते. शेती आणि
ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणाऱ्या वसंतरावांना वाढत्या नागरीकरणाचे आणि नागरी
प्रश्नांचेही चांगले भान होते. म्हणूनच त्यांनी समतोल विकासाला प्राधान्य दिले. आज
आपल्यासमोर असलेले शेती, पाणी, सिंचन, पायाभूत सुविधा आदी प्रश्न सोडविताना स्व.
नाईक यांच्या विचारांनीच पुढे जावे लागणार आहे. यादृष्टीने त्यांचे जीवनकार्य
आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाची भूमिका बजावील, असा
विश्वास श्री. चव्हाण यांनी आपल्या अभिप्रायात व्यक्त केला आहे.
आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणी करण्यात मोलाची
कामगिरी करणाऱ्या
स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित त्यांच्या जीवन कार्याचा वेध घेणाऱ्या 'वसंत वैभव' या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन सचिवालय जिमखाना येथे करण्यात आले.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, जलसंपदा मंत्री सुनील
तटकरे, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे,
अन्न व औषधे प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री श्रीमती
फौजिया खान, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक प्रमोद नलावडे आदी
मान्यवर उपस्थित होते.
'वसंत
वैभव'प्रदर्शन दि. 4 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी स. 10
ते सायं. 7 पर्यंत खुले आहे. स्व. वसंतराव नाईक यांनी
सव्वाअकरा वर्ष महाराष्ट्राची धूरा सांभाळली. या कारकीर्दीतील स्व. वसंतराव नाईक
यांची जीवनयात्रा, त्यांची सामाजिक बांधिलकी, महत्त्वाचे निर्णय, मुत्सद्दी
वसंतराव, रसिक मुख्यमंत्री, विकासाचा ध्यास, हरित क्रांतीचा जादूगर, धवल क्रांती,
कृषीपूरक कार्यक्रमांना चालना, उभारणी आधुनिक महाराष्ट्राची आदी माध्यमातून स्व.
वसंतराव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाची गौरव गाथा छायाचित्रांद्वारे अतिशय उत्कृष्टपणे
या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.
0 0 0 0
0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा