उत्तराखंड येथील पुरात अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना
राज्य शासनामार्फत मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
प्रवाशांच्या सर्वतोपरी मदतीसाठी पथक रवाना
मुंबई, दि. 18 : उत्तर भारतामध्ये, विशेषत: उत्तराखंड राज्यात
महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सुटकेसाठी राज्य शासनामार्फत सर्व
ती मदत युध्दपातळीवर देण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. दिलली येथील महाराष्ट्र सदनातील अतिरिक्त
निवासी आयुक्त प्रदीप कुमार यांच्या अधिपत्याखाली पथक घटनास्थळी पाठविण्यात आले
असून हे पथक डेहराडून येथे पोचले आहे.
डेहराडून
येथे राज्य शासनामार्फत शिबीर कार्यालय सुरु करण्यात येणार असून या
कार्यालयामार्फत महाराष्ट्रातील प्रवाशांना आवश्यक ती सामुग्री तसेच वाहन
व्यवस्थाही केली जाणार आहे. या पथकांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्याचेही
मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
उत्तराखंड
येथे महाराष्ट्रातून जे यात्रेकरु प्रवासी गेले आहेत त्यांची अद्ययावत माहिती गोळा
करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, तसेच परिवहन आयुक्त यांना आदेश देण्यात
आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ही माहिती आता उपलब्ध होत आहे. या
संदर्भात उत्तराखंडाचे मुख्य सचिव यांच्याशी सविस्तर बोलणे झाले असून
त्यांच्याकडूनही मदत दिली जात आहे.
महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालक श्रीमती
आय.ए.कुंदन मदतकार्याबाबत संनियंत्रण करीत आहेत.
प्रवाशांनी
मदत व माहितीसाठी प्रदीप कुमार, अतिरिक्त निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन :
09868140663, जगदीश चंद्र उपाध्याय – 09818187793 यांच्याशी संपर्क
साधावा. हे पथक प्रवाशांच्या सुरक्षित
परतीसाठी उत्तराखंड राज्यास देखील सहाय्य करणार आहे.
इतर राज्यात सहलीसाठी अथवा फिरावयास जाण्यापूर्वी संबंधित
राज्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधूनच पुढील प्रवासाची दिशा
ठरवावी, असे आवाहन जनतेस तसेच ट्रॅव्हल एजन्सीकरिता करण्यात येत आहे. या अनुषंगाने
मंत्रालयात राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र, मुंबई – 022 – 22027990, 22816625,
22854168 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
-----०-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा