प्रत्येक जिल्ह्याचा मानव विकास अहवाल
तयार करणार - मुख्यमंत्री
तयार करणार - मुख्यमंत्री
पुणे, दि. 17 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा मानव विकास अहवाल तयार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे येथील लोकनेते यशवंतराव चव्हाण शिक्षण संकुलात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित होते. रांगोळी, पताका यांच्या सहाय्याने सजवलेली शाळा, नव्या गणवेशातील विद्यार्थी अशा उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम झाला.
मुख्यमंत्री म्हणाले,
संयुक्त राष्ट्र संघाने विकासाचे
मोजमाप करण्यासाठी मानव विकास
निर्देशांक जाहीर करण्याचे धोरण
स्वीकारले. आपल्या देशातही विविध
राज्यांत मानव विकास अहवाल
प्रसिद्ध करण्यात आले. त्याच
धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा
मानव विकास अहवाल प्रकाशित
केला जाईल. त्यामध्ये शिक्षण,
आरोग्य, पायाभूत सुविधा अशा
विविध बाबींचा विचार केला
जाईल.
शिक्षणातील गुंतवणूक
सर्वाधिक फायद्याची असते असे
सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
केंद्र सरकारने पायाभूत सुविधांबरोबरच
आरोग्य आणि शिक्षण या दोन
सुविधांचाही विकास करण्यासाठी मोठ्या
प्रमाणावर योजना आखल्या. सर्व
शिक्षा अभियान, राष्ट्रीय आरोग्य
अभियान, भारत निर्माण या योजनांमुळे
देशांतील पायाभूत त्याचबरोबर मानवी
जीवन उंचावण्याच्या अनुषंगाने
विकास झाला.
राज्यातील शिक्षणाचा
संख्यात्मक विकास मोठ्या प्रमाणावर
झाला आहे. पण आता
गुणात्मक विकास करण्याची आवश्यकता
असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
शालेय शिक्षण उच्च शिक्षणाचा
पाया आहे. हा पाया
मजबूत होण्याची आवश्यकता आहे.
ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत देशाचे
स्थान बळकट होण्यासाठी शिक्षणाची
गुणवत्ता उंचावली पाहिजे.
शालेय शिक्षणमंत्री
राजेंद्र दर्डा यांनी राज्य
शासनाने शालेय अभ्यासक्रम राष्ट्रीय
पातळीशी समकक्ष करण्याचे नियोजन
केल्याचे सांगितले. नववी
ते बारावीचा अभ्यासक्रमात त्या
अनुषंगाने बदल करण्यात आले
आहेत. यंदा पहिली, दुसरीचा
अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे.
पुढीलवर्षी तिसरी,चौथी आणि
पाचवीचा तर 2015 मध्ये सहावी,
सातवी आणि आठवीचा अभ्यासक्रम
बदलला जाणार असल्याचेही त्यांनी
सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांच्या हस्ते
विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
करण्यात आले. त्यांच्या हस्ते
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वितरण
करण्यात आले. रांगोळी, पताका
यांच्या सहाय्याने सजविलेल्या
शाळेच्या आवारात एकदम चैतन्याचे
वातावरण होते. नवीन पुस्तके,
साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर
आनंद दिसत होता.
यावेळी आमदार
बापूसाहेब पठारे, आमदार जयदेव
गायकवाड, माजी आमदार चंद्रकांत
छाजेड, उल्हास पवार, विभागीय
आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी
विकास देशमुख, महानगरपालिका आयुक्त
महेश पाठक, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आदी
उपस्थित होते.
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा