ज्येष्ठ गायिका आशा
भोसलेंनी दिला पाच लाखांचा धनादेश
समाजाच्या सर्व थरांतून दुष्काळनिधीला होणारी
मदत जनतेच्या सजगतेचे लक्षण : मुख्यमंत्री
मुंबई,
दि. 24 : दुष्काळग्रस्त बांधवाना मदतीचा हात मिळावा म्हणुन शालेय विद्यार्थ्यांपासून
ते सर्वसामान्य नागरिक, उद्योगपती, कलाकार अशा विविध समाजघटकांकडुन दुष्काळ निधीला
मिळणारी मदत ही जनतेच्या सजगतेचे लक्षण आहे, अशी भावना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज श्री. चव्हाण यांच्याकडे
दुष्काळनिधीसाठी पाच लाखांचा धनादेश दिला, त्यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली.
श्रीमती
आशाताईंना अलिकडेच ह्रृदयेश आर्टच्या वतीने ह्रृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात
आला होता. पुरस्काराची रु. एक लाखाची रक्कम आपण मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ)साठी
देणार असल्याची घोषणा त्यांनी त्या समारंभातच केली होती. पुरस्काराच्या रकमेत चार लाखांची
भर घालुन त्यांनी पाच लाख रुपये मदत दुष्काळनिधीला दिली. दुष्काळ आणि पाणीटंचाईने त्रस्त
झालेल्यांना दिलासा देणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सरकारने सुरु केलेल्या
उपाययोजनांना प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे आणि त्यात आपलाही छोटासा वाटा असला पाहिजे,
असे श्रीमती आशाताई यावेळी म्हणाल्या.
आतापर्यंत 116 कोटी जमा
दरम्यान,
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आवाहनाला जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळे मुख्यमंत्री
सहायता निधी (दुष्काळ) 2013 मध्ये आतापर्यंत 116 कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये
सिद्धीविनायक देवस्थान ट्रस्ट, प्रभादेवी – 25 कोटी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी
-25 कोटी यांच्यासह अनेक संस्था, व्यक्ती, बँका यांच्या देणग्यांचा समावेश आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा