रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ
क्लबतर्फे दुष्काळग्रस्तांना
51 लाखांची मदत
मुंबई, दि. 28: रॉयल वेस्टर्न
इंडिया टर्फ क्लबच्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता
निधीसाठी 51 लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. मुंबई रेसकोर्सवर 'मा.
मुख्यमंत्री गोल्डकप 2013' चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष
श्री. के. एन. धनजीभॉय यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 लाख रूपयांचा धनादेश
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. वनमंत्री पतंगराव कदम
यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या शर्यतीत विजेता ठरलेल्या घोड्याचे मालक
श्री. प्रकाश अग्रवाल यांना श्री. चव्हाण यांच्या हस्ते 'मुख्यमंत्री गोल्डन कप
2013' प्रदान करण्यात आला. श्री. चव्हाण यांनी या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त
केली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा