राजर्षी शाहू सभागृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर दि. 9 : सर्किट हाऊस येथे सुमारे 2 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या राजर्षी शाहू सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या सभागृहाची आसन क्षमता 144 असून व्यासपीठावरील आसन क्षमता 11 इतकी आहे. या सभागृहाचा उपयोग सर्व शासकीय बैठका, कार्यक्रम, पत्रकार परिषदांसाठी होणार आहे.
यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार जयवंतराव आवळे, आमदार सा. रे. पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने,
महापालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, अधीक्षक अभियंता डी. वाय. पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा