कॅार्निंग कंपनीसमवेत सामंजस्य करार
उद्योजकांना दर्जेदार, परिपूर्ण पायाभूत सुविधा
देण्यावर राज्य सरकारचा भर : मुख्यमंत्री
मुंबई, दि.
4: आंतररराष्ट्रीय उद्योजकांना त्यांच्या दर्जाला साजेशा परिपूर्ण पायाभूत सुविधा
देण्याच्या राज्य शासनाचा प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय
गुंतवणुकदार आकर्षित होत आहेत. सर्व प्रकारची अनुकुलता, सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि
शासन-उद्योजक यांच्यातील मैत्रीपूर्ण वातावरणामुळे हे शक्य झाले आहे, असे
प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
राज्य शासन
आणि मे. कॅार्निंग टेक्नॅालॅाजिज इंडिया लि. यांच्यात चाकण येथील ऑप्टीकल फायबर
ग्लास निर्मितीच्या विशाल प्रकल्पाबाबत सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी ते
बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम
कुंटे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमआयडीसीचे मुख्य
कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, मे. कॅार्निंग टेक्नॅालॅाजिज इंडिया लि.
कंपनीचे ग्लोबल व्हाईस प्रेसिंडेंट जनरल
मॅनेजर स्टीफन मिलर, व्यवस्थापकीय संचालक
रूस्तुम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. श्री.
श्रीवास्तव आणि श्री. देसाई यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
मुख्यमंत्री
म्हणाले की, महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग
विभागामार्फत आणि औद्योगिक विकास महामंडळामार्फत उत्तम प्रकारच्या पायाभूत
सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. याचा फायदा उद्योजकांनी घेऊन राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी.
उद्योगमंत्री
नारायण राणे म्हणाले की, राज्य सरकारने नेहमीच उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, असे
मैत्रीपूर्ण धोरण राबविले आहे. उद्योजकांना नेहमी पाठिंबा दिल्याने देशी-परदेशी
उद्योजक महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक असतात. यामुळेच देशात होणाऱ्या थेट परदेशी
गुंतवणूकीच्या एक तृतीयांश गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. कॅार्निंग
टेक्नॅालॅाजिज इंडिया कंपनीच्या माध्यमातून चाकण येथे 588 कोटींची गुंतवणूक होत
आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. या
कंपनीने आता महाराष्ट्रात अन्य ठिकाणी आपला विस्तार करावा, असे आवाहनही त्यांनी
केले.
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या
व्यवस्थापकीय संचालक श्रीमती राधिका रस्तोगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
व आभार मानले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा