भारतीय स्टेट बँकेमार्फत दुष्काळग्रस्तांसाठी २ कोटींची मदत
मुंबई, दि. २३ : भारतीय स्टेट बँकेमार्फत दुष्काळग्रस्तांसाठी २ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री
सहाय्यता निधीला देण्यात आली.
सह्याद्री राज्य अतिथिगृह
येथे आज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा समूह कार्यपालक (राष्ट्रीय बॅंकींग) ए. कृष्ण कुमार
यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. भारतीय स्टेट
बँकेने सामाजिक बांधिलकीतून दुष्काळग्रस्तांसाठी राबविलेल्या विविध उपाययोजना
अनुकरणीय आहेत, अशी प्रशंसा यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली. याप्रसंगी बँकेचे
मुख्य महाव्यवस्थापक डॉ. जे. एन. मिस्रा, महाव्यवस्थापक रवींद्र जोशी, महाव्यवस्थापक
अरिजित बासू, महाव्यवस्थापक श्रीमती अनशुला कांत आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित
होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा