सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
लोकशाही दिन संपन्न

          मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनी एका अर्जांवर सुनावणी करण्यात आली. महसूल विभागाशी संबंधीत असलेल्या या अर्जदाराला शासकीय नियमाप्रमाणे आवश्यक ती मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. 
        यावेळी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पी.एस. मीना, पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्यासह संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आजच्या लोकशाही दिनी एकूण तीन अर्ज आले होते. त्यातील दोन अर्जदारांच्या तक्रारीवर समाधानकारक कार्यवाही झाल्याने ते उपस्थित राहिले नाहीत.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा