बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३


मुरमाडी (भंडारा) येथील घटना निंदनीय : मुख्यमंत्री
पीडीत मुलींच्या आईला दहा लाख रुपयांची
मदत जाहीर : पोलिस निरीक्षक निलंबित

मुंबई, दि. 19 : भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील मुरमाडी येथे एकाच घरातील तीन मुलींवर बलात्कार करुन, त्यांना ठार मारण्याची घटना निंदनीय आणि क्लेशकारक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल असुन, केंद्रीय मंत्री श्री. प्रफुल्ल पटेल व पालकमंत्री यांनीही तेथे भेट दिली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांना घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून, या मुलींच्या आईला विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून एकुण दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सदर प्रकरणी नागरिकांनी शांतता पाळुन कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

00000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा