पुणे शहराच्या वाढीव हद्दीच्या (23 गावे) विकास योजनेसाठी
बायो डायव्हर्सिटी पार्क (बीडीपी) आरक्षणाला मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई, दि. 2 : पुणे शहराच्या वाढीव हद्दीची (23 गावे) विकास योजना शासनास
सादर करतांना पुणे महानगरपालिकेने त्यामध्ये BDP या नावाने आरक्षण प्रस्तावित केले
होते. हे आरक्षण शहरातील 12 गावे व 7 टेकडयांवर पसरलेले आहे. BDP आरक्षणाचे एकूण क्षेत्र 978.54 हेक्टर. (सरकारी
124.45 हे. + खाजगी 853.09 हे.) प्रस्तावासंदर्भाने
सविस्तर अभ्यास करण्यासाठी शासनाने CEPT अहमदाबाद येथील पर्यावरण विभागाचे प्रमुख
डॉ.के.बी.जैन यांचे अध्यक्षतेखाली
समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींनुसार मुख्यमंत्री
श्री. चव्हाण यांनी बीडीपी आरक्षणाला मान्यतास दिली आहे.
तज्ञ समितीच्या प्रमुख शिफारशी अशा आहेत. 1) BDP हे आरक्षण कायम ठेवावे. 2)आरक्षणाखालील जागेच्या बदल्यात मालकास TDR दयावा. पहिल्या वर्षी जागा देणा-यांना
अतिरिक्त TDR दयावा. 3)पूर्वबांधिलकी असलेले
क्षेत्र (सुमारे 73 हे.) आरक्षणातून वगळावे. तज्ञ समितीने 4% TDR देण्याची शिफारस करतांना Ready Recknor मधील जागेचे दर विचारात घेऊन
विकसन क्षमता विचारात घेतली होती.
परंतु, प्रत्यक्षात जागेची
बाजारभावाप्रमाणे किंमत विचारात घेणे आवश्यक होते.
शासनाने संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, यांचेकडून BDP खालील जागेचे बाजारभावानुसारचे मूल्यांकन दर
निश्चित करुन घेऊन व त्याआधारे जागेची
विकसनक्षमता विचारात घेवून
त्यानुसार जागेच्या 8% एवढा TDR जागामालकांना देण्याचा निर्णय
घेतला आहे. BDP आरक्षणाचे क्षेत्र खूप मोठे आहे. हया क्षेत्राचे पहिल्या वर्षातच भरीव स्वरुपाचे
संपादन शक्य व्हावे यासाठी, जे जागामालक त्यांची जागा पहिल्या वर्षी महानगरपालिकेस हस्तांतरीत
करतील, त्यांना प्रोत्साहनात्मक अतिरिक्त
2% एवढा (एकूण 8+2 =
10%) TDR देण्याचाही निर्णय शासनाने घेतला
आहे.
ज्या जमिनीवर BDP हे आरक्षण येण्यापूर्वी सक्षम
प्राधिकरणाकडून विकास/उपविभागणी/रेखांकन/ बांधकाम परवानगी मंजूर केली असेल व ती
परवानगी BDP आरक्षण येण्याच्या वेळी वैध असेल
अशा प्रकरणांखालील जमिनी आरक्षणातून वगळण्याचा व त्या जमिनींवरील पूर्वबांधिलकी
कायम ठेवण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. उपरोक्त बाबी वगळता समितीच्या अन्य
शिफारशी शासनाने स्विकारल्या आहेत.
BDP आरक्षणातून निर्माण होणा-या TDR ला
"Green TDR" म्हणून विशेष दर्जा देण्याचा
व हा TDR शहरातील सर्व TDR झोनमध्ये वापरणे अनुज्ञेय करण्याचे प्रस्तावित
आहे. हा
TDR, वापरण्याचे
प्रमाण संबंधित जागांच्या शीघ्रसिध्दगणकातील किंमतीतील प्रमाणाशी (Ratio) सलग्न
करण्यात आले आहेत. वापराचे
प्रमाण हे रस्तारुंदीशी देखील निगडीत ठेवण्यात येणार आहे.
BDP संदर्भाने होणारे निर्णय हे जनतेच्या हरकती/सूचनांसाठी प्रसिध्द
करण्यांत येत आहे.
-----------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा