ईद-ए-मिलादनिमित्त
मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मोहम्मद पैगंबरांचा समतेचा संदेश
आजही प्रेरणादायी : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 24 : सर्व माणसे समान असून कोणीही उच्चनीच नाही, हा प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी दिलेला समतेचा
संदेश आजही प्रेरणदायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम
बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या
आहेत.
शुभेच्छा संदेशात श्री. चव्हाण म्हणतात की, मोहम्मद
पैगंबरांचा जन्मदिन जगातील लाखो लोक ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करतात. प्रेषित मोहम्मद पैगंबर हे शांततेचे पुरस्कर्ते आणि मानवतावादी होते. मोहम्मद पैगंबर
यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे कृतज्ञतापूर्वक
स्मरण करतानाच त्यांचा सहिष्णुता, शांतता, संयम आणि प्रेमाचा संदेश आचरणात आणणे
गरजेचे आहे. अखिल मानवजातीला प्रेरक असे पैगंबरांचे विचार सध्याच्या आधुनिक युगातही
तितकेच अनुकरणीय आहेत. आज संपूर्ण जगाला शांततेची
गरज आहे. पैगंबरांचे विचार आत्मसात केल्यास संपूर्ण जगाला शांती मिळेल आणि जग हे
एक कुटुंब असल्याची भावना वाढीला लागेल.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा