भाऊसाहेब निंबाळकरांच्या निधनाने
माझे व्यक्तिगत नुकसान : मुख्यमंत्री
नागपूर, दि. 11 : भाऊसाहेब निंबाळकर यांचे माझ्या जीवनप्रवासात अनन्यसाधारण
महत्व आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे विश्वासु पाईक असलेल्या भाऊसाहेबांच्या
निधनाने माझे आणि माझ्या कुटुंबियांचे व्यक्तिगत नुकसान झाले आहे, अशा शब्दात
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ क्रिकेटपटु कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचे कोल्हापूर येथे मंगळवारी
निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे
की, श्री. निंबाळकर हे क्रिक्रेटपटु म्हणुन थोर होतेच, परंतु व्यक्ती म्हणुनही ते
खुप मोठे होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची त्यांची शिकवण होती. कोल्हापूरच्या
कलनाकवाडीकर निंबाळकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. कोल्हापूर, इंदुर, देवास, बडोदा
आणि उदयपूर संस्थानामध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. नंतर त्यांनी रेल्वे पोलीस दलामध्ये (आर.पी.एफ.) वरिष्ठ अधिकारी म्हणून
कामगीरी केली.
त्यांच्या गौरवशाली क्रिकेट कारकिर्दीबद्दल श्री. चव्हाण म्हणतात की, कर्नल
सी. के. नायडुंना गुरुस्थानी मानणाऱ्या कॅप्टन निंबाळकरांची प्रथमवर्ग क्रिकेटमधील कारकिर्द 1939-40 ते
1964-65 अशी प्रदीर्घ होती. या 25 वर्षे सलग कारकिर्दीत रणजी करंडक सामान्यात
त्यांनी विविध संघाचे प्रतिनिधीत्व केले. या कारकिर्दीत त्यानी 80 सामन्यात 47.93
च्या सरासरीने 4841 धावा केल्या. अत्यंत संयमित, तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ते
प्रसिद्ध होते.
त्याचबरोबर मध्यमगती गोलंदाज म्हणुनही त्यांनी चांगली कामगिरी करीत आपल्या
नावावर 58 बळींची नोंद केली. 1948-49च्या हंगामात महाराष्ट्र विरुद्ध काठेवाड या
पुण्यात झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाकडुन खेळताना त्यांनी केलेला नाबाद 443
धावांचा राष्ट्रीय विक्रम आजही अबाधित आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
0000000000000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा