ज्येष्ठ क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांचे निधन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अंत्यदर्शन घेतले
कोल्हापूर दि. 11
: ज्येष्ठ क्रिकेटपटू कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचे आज वयाच्या 93 व्या
वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर
येथे कॅप्टन निंबाळकर यांचे अंत्यदर्शन घेऊन कुंटुंबियांचे सांत्वन केले.
भाऊसाहेबांच्या
निधनाने माझे फार मोठे व्यक्तीगत नुकसान झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच युवा खेळाडूंना त्यांच्या खेळामुळे
प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाऊसाहेब निंबाळकरांची प्रथमवर्ग क्रिकेटमधील कारकिर्द 1939-40 ते 1964-65 अशी प्रदीर्घ होती. या कारकिर्दीत
त्यानी 80 सामन्यात 47.93 च्या सरासरीने 4841 धावा केल्या. अत्यंत संयमी, तंत्रशुद्ध
फलंदाजीसाठी ते प्रसिद्ध होते. 1948-49 च्या
हंगामात महाराष्ट्र विरुद्ध काठेवाड (सौराष्ट्र) या पुण्यात झालेल्या सामन्यात महाराष्ट्र
संघाकडुन खेळताना त्यांनी केलेला नाबाद 443 धावांचा राष्ट्रीय विक्रम आजही अबाधित आहे
असे सांगुन यावेळी त्यांनी भाऊसाहेब निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी गृहराज्यमंत्री सतेज
पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा