आर्थिक सुधारणांमुळे बँकिंग क्षेत्राला आधिक महत्व
- मुख्यमंत्री चव्हाण
यांचे प्रतिपादन
पुणे, दि. 24 : केंद्र शासन
राबवित असलेल्या आर्थिक सुधारणांच्या
कार्यक्रमामुळे बैंकिंग क्षेत्राला अधिक
महत्व येणार असून बँकिंग
क्षेत्राची विकासाच्या प्रक्रियेत महत्वाची
भूमिका आहे, असे प्रतिपादन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
आज येथे केले.
बँक ऑफ महाराष्ट्र
आणि इंडियन बँक असोसिएशन
यांच्यावतीने आयोजित केलेल्या बँकॉन
परिषदेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सहकार
आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन
पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नरेंद्र सिंग,
इंडियन बँक असोसिएशनचे प्रमुख
एम.आर.कामत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री
म्हणाले, बँकिंग क्षेत्राने देशाच्या
आणि राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेत
महत्वाची भूमिका बजावली आहे.
या क्षेत्राच्या राष्ट्रीयीकरणामुळे ही गोष्ट साध्य झाली.
बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात
आले,
त्यावेळी टीका खूप झाली.
पण 2008 मध्ये आलेल्या आर्थिक अडचणींचा
राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थेमुळेच आपण
सामना करू शकलो.
मुख्यमंत्री
म्हणाले, आपल्या देशाकडे मोठ्या
प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती नाही.
आपल्याला अनेक गोष्टींवर दुसऱ्या
देशांवर अवलंबून राहावे लागते.
त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बळावर
आपण महासत्ता होऊ शकत
नाही. त्यामुळे आपल्याला नव्या
कल्पानांच्या आधारावरच विकास आणि
प्रगती केली पाहिजे. असा
विकास साध्य करण्यासाठी बँकिंग
क्षेत्रांने नव्या कल्पना राबविण्याबरोबरच नवनवी क्षेत्रे बँकिंगच्या परिघात
आणायला हवीत. आपण शिक्षणाचा,
माहितीचा अधिकार असे नवनवे
अधिकार नागरिकांना दिले. आता
कर्जाचा अधिकारही (राईट टू क्रेडिट)
द्यायला हवा. त्यादृष्टीने बँकिंग
क्षेत्रांने कार्य करायला हवे.
मुख्यमंत्री
म्हणाले, राज्यात सध्या मोठ्या
प्रमाणावर शहरीकरण होत आहे.
शहरांच्या नियोजनासाठी स्थानिक
स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणावर
निधीची आवश्यकता आहे. बँकांनी
या क्षेत्रात कार्य करण्याची
आवश्यकता आहे. व्यापारी आणि
राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी क्षेत्राला
गेल्या वर्षात पतपुरवठ्यात केलेल्या
वाढीबद्दलही मुख्यमंत्री चव्हाण
यांनी सर्व बँकाचे आभार
मानले आणि कृषी क्षेत्राचा
पतपुरवठा यापुढेही सुरू ठेवावा,
असे सांगितले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा