साहित्यातील
छोटे प्रवाहही आशादायक
86
व्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.नागनाथ कोतापल्ले
यांची डॉ. संभाजी खराट यांनी घेतलेली मुलाखत येथे देत आहोत.
|
डॉ.नागनाथ
कोतापल्ले यांची चिपळूण येथे होणा-या 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे त्यांचे
अभिनंदन केले. त्यानंतर त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. या गप्पाच्या ओघात
त्यांना काही प्रश्न विचारले. त्यांनीही मनमोकळेपणाने उत्तरे दिली. अध्यक्षपदी
निवड झाल्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय सर? असे विचारले तेव्हा सर नेहमीप्रमाणे
हसले. माझी निवड होणार हे निश्चित होते. मी गेले वर्षभर माझ्या मित्रांशी,
लेखकांशी संवाद साधत होतो. उभे राहू का? विचारत होतो. सर्वांनीच "राहा"
असे सांगितल्यावर मी उमेदवारी अर्ज भरला. जिंकायची खात्री असेल तरच उमेदवारी अर्ज भरणार नसता नाही असे
ठरवल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षपद हा मोठा बहुमान आहे. प्रत्येक साहित्यिकांची ती इच्छा असते. आपणाला काय वाटते? असे विचारल्यावर ते थोडेसे विचारमग्न झाल्याचे जाणवले. त्यांनी सांगितले. या महाराष्ट्रात साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे. खांडेकर, फडके, शांता शेळके, शंकर पाटील, डहाके, अशा अनेक थोर साहित्यिकांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यामुळे आपण जी काही वाड्:मयीन सेवा केली. तिला समाजमान्यता मिळाली. असे वाटते. त्यामुळे मला आनंद वाटतो. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून चिंतन करायला मिळणे ही मोठी गोष्ट मानतो. मला ही संधी माझ्या तमाम साहित्यप्रेमी, लेखकांनी, मित्रांनी दिली.

विविध प्रवाह आणि विविध छोटया साहित्य संमेलनाबाबत काय वाटते? असे विचारल्यावर
त्यांनी विस्तृत आढावा घेतला. साहित्यात दलित, आदिवासी, स्त्रीवादी, ग्रामीण,
परिवर्तनवादी साहित्य मोठया प्रमाणात प्रसिध्द होत आहे. ही चांगली बाब आहे.
प्रत्येकाच्या वेदना आणि जाणीवा त्यातून बाहेर पडत आहेत त्याचे स्वागतच केले
पाहिजे. फार मोठे सामाजिक परिवर्तन घडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हयात,
तालुक्यात आणि खेडया-पाडयातही छोटी साहित्य संमेलने होत आहेत. त्यांच स्वागत करून
प्रोत्साहन दिले पाहिजे. शेकडो वर्षांपासून दबलेला आवाज आज मोकळा श्वास घेत आहे.
अलीकडे साहित्य संमेलनाला तरुणवर्ग फार कमी येतो. अशी ओरड असते. त्याबाबत विचारल्यावर त्यांना ही गोष्ट मान्य नाही. औरंगाबाद, परभणी, पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनाला मोठया प्रमाणात तरुणांची गर्दी होती. विशेषत ग्रामीण भागातील तरुण आजही मोठया संख्येने हजेरी लावतात. मोठया प्रमाणात पुस्तके खरेदी करतात. हे नाकारता येत नाही.

वाचन
संस्कृती वाढताना दिसत नाही हा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्यांनी हा मुद्दा
मान्य करीत टि.व्ही., संगणक, इंटरनेटमुळे थोडा परिणाम झाल्याचे सांगितले. मुळातच
वाचायचे असेल तर वेळ दिला पाहिजे. गोडी वाटली पाहिजे. आता शेतातून दमून-भागून
आलेला शेतकरी वाचणार का? व्यापारी, दुकानदार काय वाचणार? हा फरक लक्षात घेतला
पाहिजे. शाळा, विद्यापीठे, ग्रंथालये, साहित्यसंस्था यांनी वाड्:मयाच्या
प्रसिध्दीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
साहित्य संमेलनातील परिसंवादात काही बदल करावेत असे वाटते का? या बाबत विचारल्यावर त्यांनी तरुण लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्यासाठी स्वतंत्र परिसंवाद, चर्चासत्र असावे. त्यामुळे त्यांना नेमके काय म्हणायचे हे स्पष्ट होईल. कोतापल्लेसर अनेक मित्रांचे, लेखकांचे फोन घेऊन अभिनंदनाचा स्विकार करीत होते. मोबाईल सारखा खणखणत होता. शेवटी अभिनंदन करून मी निरोप घेतला.

-------
डॉ.संभाजी खराट
मोबा- 9422595788
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा