मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२



माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्या निधनाने
ग्रामीण विकासाचा ध्यास असलेले नेतृत्च हरपले
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई, दि. 23 : माजी मंत्री आणि वाई परिसराचे आधारस्तंभ असलेले श्री. मदनराव पिसाळ यांना ग्रामीण, दुर्गम भागाच्या विकासाचा ध्यास होता. या परिसरात सोयीसुविधा व्हाव्यात, यासाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्या निधनाने ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
        स्व. पिसाळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना श्री. चव्हाण म्हणतात की, सातारा जिल्ह्याच्या विकासात स्व. मदनराव यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी वाई परिसराच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. बावधनच्या उपसरपंचपदापासुन त्यांनी आपली राजकीय आणि सामाजिक कारकिर्द सन 1958 साली सुरु केली. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी वाई परिसरात मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या. भुईंजच्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. बावधन येथे वार्द तालुका सहकारी सूतगिरणीची स्थापना करुन त्यांनी या भागात रोजगाराचे एक मोठे साधन निर्माण केले. 1985 ते 2005 या काळात ते विधानसभेचे सदस्य होते. याच काळात त्यांनी पणन आणि स्वयंरोजगार खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील जनता नेहमी कृतज्ञ राहील.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा