राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
जेष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांना जाहिर
मुंबई, दि. 30 : राज्य शासनाचा 2012-13 गानसम्राज्ञी
भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार
जेष्ठ संगीतकार आनंदजी शहा
यांना घोषित करण्यात आला
आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री,
मा.ना.श्री. संजय देवतळे यांच्या
अध्यक्षतेखाली निर्णय समितीने नुकताच
हा पुरस्कार घोषित केला.
रु.5 लाख, मानचिन्ह, मानपत्र,
श्रीफळ आणि शाल असे
या पुरस्काराचे स्वरुप
आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
आणि सांस्कृतिक कार्य मंत्री संजय
देवतळे यांनी श्री. आनंदजी
शहा यांचे अभिनंदन केले
आहे. या पुरस्काराचे
वितरण लवकरच दिमाखदार समारंभात
करण्यात येईल.
आनंदजी शहा
यांचा जन्म कुंदरोली, कच्छ
(गुजरात)
या ठिकाणी दिनांक 2 मार्च
1933
साली झाला. त्यांचे वडील हे कच्छचे
व्यापारी होते. त्यांनी व्यवसायानिमित्त मुंबईत किराणा मालाचे दुकान
सुरु केले. मुंबईतील गिरगाव या ठिकाणी
अनेक वर्ष संगीत श्रवणात
रमले. दुसऱ्यास आकर्षित करण्यासाठी
सहज असलेले गुण लक्षात
घेता ते अल्प काळात
प्रसिध्दीस पावले.
भारतीय संगीतात
प्रसिध्द रचनाकार म्हणून त्यांची
ख्याती होती. त्यांनी हिंदी
चित्रपट सृष्टीत विविध गीतांना
संगीतमय करुन गीते अजरामर
केली. सन 1970 या साली
दोन गुजराती बांधवांची जोडी
एकत्रित एकाच रंगमंचावर संगीतासाठी
काम करु लागली. त्यांच्या सोबत असलेली
व्यक्ती म्हणजे
कल्याणजी.
त्यांनी त्यांच्या
हयातीत डॉन, बेरंग, सरस्वतीचंद्र, कुरबानी आणि सफर या अजरामर
चित्रपटांना संगीतस्वर देऊन हिंदी
चित्रपटांना पुरस्कार मिळवून दिले. कोराकागज या चित्रपटास
संगीताचे उत्तम संगीत दिग्दर्शन
दिल्याबद्दल त्यांना सन 1975 चा फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांना सन 1965 साली
हिमालय की गोदमें या चित्रपटास
संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार,
सरस्वतीचंद्र या चित्रपटास उत्तम
संगीतासाठी सन 1968 मध्ये पहिला
राष्ट्रीय पुरस्कार, एच.एम.व्ही.
या कंपनीने त्यांना सन 1978 साली
मुक्कदर का सिंक्कदर या चित्रपटासाठी
पहिली प्लॅटिनियम डिस्क प्रदान
केली. पॉलिडोर या कंपनीने कुरबानी या चित्रपटासाठी
सन 1980 मध्ये पहिली प्लॅटिनियम
डिस्क प्रदान केली. हिंदी
चित्रपटांस योगदान दिल्याबद्दल 1992 चा इम्पा
या पुरस्कारांने गौरविण्यात
आले. सहारा परिवारातर्फे यु.के.
येथे सन 2004 साली जीवन
गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात
आले. अनेक पुरस्कार प्राप्त
झालेल्या आनंद विरजी शहा
यांची कारकिर्द त्यामुळे उंचावत
गेली.
ज्येष्ठ संगीतकार
खय्याम, अशोक पत्की, कवी
ना.धो. महानोर आणि आशुतोष
घोरपडे संचालक, सांस्कृतिक कार्य
यांच्या निवड समितीने आनंदजी
शहा यांचे संगीत क्षेत्रातील
योगदान व अनुभव लक्षात
घेता त्यांच्या नांवाची पुरस्कारासाठी
शिफारस केली होती. त्यानंतर
मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य,
मा. राज्यमंत्री सांस्कृतिक
कार्य, मा. अप्पर मुख्य
सचिव, सांस्कृतिक कार्य व संचालक,
सांस्कृतिक कार्य यांच्या निर्णय
समितीने आनंदजी शहा यांना
हा पुरस्कार देण्याबद्दलचा निर्णय
एकमताने घेतला. संगीत, गायन
क्षेत्रात मोलाचे काम केलेल्या
व्यक्तींना 1992 पासून गानसम्राज्ञी लता
मंगेशकर यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार
राज्य शासनाकडून देण्यात येतो.
या आधीही सुमन कल्याणपुरकर, संगीतकार खय्याम, सुलोचना चव्हाण
इत्यादी मान्यवरांना या पुरस्कारांने
शासनाकडुन सन्मानित करण्यात आले
आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा