पुणे स्फोटाबाबत
मुख्यमंत्र्यांची
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी
पुण्यात चर्चा
पुणे
दि. 4 : मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण
यांनी आज शासकीय
विश्रामगृहात पुणे
स्फोटाच्या तपासाबाबत
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
केली. विभागीय आयुक्त
श्री.प्रभाकर देशमुख,
जिल्हाधिकारी श्री.
विकास देशमुख, पोलिस
आयुक्त श्री.
गुलाबराव पोळ,
अतिरिक्त आयुक्त
श्री. शहाजी साळुंके
उपस्थित होते.
पुण्यातील
स्फोट कोणी घडवून
आणले या संदर्भातील
तपासणी विविध पातळ्यांवर
चालू आहे. या
संदर्भातील
चौकशी पूर्ण
झाल्यानंतर यावर
आपण भाष्य करु
असे मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी पत्रकारांशी
बोलतांना सांगितले.
पुण्यातील सी.
सी. टी. व्ही.
कॅमेऱ्यांच्या देखभालीबाबतही
पुण्याच्या पोलिस
आयुक्तांशी बोलल्याचे
त्यांनी यावेळी सांगितले.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा