बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२


कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब
झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना समाधान

मुंबई, दि. 29: मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अजमल कसाबला विशेष दहशतवाद विरोधी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.  त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने देखिल शिक्कामोर्तब केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते आणि अपेक्षेप्रमाणे ही फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, याचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार त्याचप्रमाणे केंद्राने देखिल योग्य पध्दतीने न्यायालयीन यंत्रणेच्या माध्यमातून या घटनेची  चौकशी केली  हे महत्वाचे आहे. यापुढील कार्यवाही वेगाने व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
------0-----


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा