कॅप्टन
लक्ष्मी सेहगल या राष्ट्रभक्तीचे
मूर्तीमंत
प्रतिक - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 23 जुलै : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये
महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या आणि राष्ट्रभक्तीचे मुर्तीमंत प्रतिक असलेल्या रणरागिणी
कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले
आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात की, “ वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर 1940 साली त्या
सिंगापूरला गेल्या. त्यांचा पिंडच समाजसेवेचा असल्याने त्यांनी तेथे स्थलांतरित
भारतीय मजुरांसाठी दवाखाना सुरु केला. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये
त्यांनी 1943 साली प्रवेश केला आणि राणी झाशी रेजिमेंटची स्थापना
केली. सुभाषबाबुंनी त्यांना या रेजिमेंटचे कमांडरपद दिले होते. कॅप्टन म्हणून
लक्ष्मी सेहगल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची कामगिरी बजावली. पद्मविभूषण प्राप्त कॅप्टन लक्ष्मी यांनी
डॉक्टर म्हणून आपले उर्वरित आयुष्य सामाजिक सेवेत घालविले. 1971 मध्ये त्यांनी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. या माध्यमातुन त्यांनी राज्यसभेवरही
सदस्य म्हणुन काम केले. त्यांच्या निधनाने सुभाषचंद्र बोस यांचा लढा जवळून
अनुभवलेली त्यांची एक ज्येष्ठ सहकारी आज आपल्यातून निघून गेली आहे.”
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा