प्रा.राम बापट यांच्या निधनाने
एका ज्येष्ठ विचारवंताला मुकलो
-
मुख्यमंत्री
मुंबई,
दिनांक 2 जुलै : प्रा.राम बापट यांच्या
निधनाने महाराष्ट्रातील विविध परिवर्तनवादी क्षेत्रातील एका ज्येष्ठ विचारवंताला
आपण मुकलो असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात पुढे म्हणतात की, “प्रा.बापट हे सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक
होते. राज्यशास्त्र विभागात अधिव्याख्याता
म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले होते.
वेगवेगळ्या विषयांचा त्यांना मोठा व्यासंग होता. अनेक विषयात त्यांनी प्राविण्य संपादन केले
होते. साहित्य, सौंदर्यशास्त्र आणि
नाट्यशास्त्र या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील विविध भागात असंख्य नाट्यशिबिरात
त्यांनी व्याख्याने दिली होती. नव्या
पिढीतील विद्यार्थ्यांना नवा विचार देण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी सातत्याने
केले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीला नवा
विचार देणारा एक उत्तम मार्गदर्शक हरपला आहे.” असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात शेवटी
म्हटले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा