प्लॅस्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय लवकरच:मुख्यमंत्री
पंढरपूर.दि.29-पर्यावराणाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबर प्लॅस्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पंढरपूर येथे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नि सत्वशीला चव्हाण, पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे,आ.भारत भालके, आ.विलास लांडे,माजी गृह राज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख,जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,आज राज्य,देश व जग पर्यावराणातील तापमानात निर्माण होणा-या समस्येमुळे चिंतेत आहे.पर्जन्यमानात अनियमितता असल्यामुळे पाण्याचे,चा-याचे संकट आहे.मात्र यावर शासकीय यंत्रणा मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्यात दोन वर्षात 100 कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.या दिंडीद्वारे पर्यावरण विषयक कार्यक्रम राबविण्यात आला असून, याची व्याप्ती वाढवावी असे अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी केली.
वाढत्या प्रदुषणाला पायबंद घालण्यात यावा. पर्यावरण रक्षणाबाबत गांर्भीयाने विचार होणे आवश्यक असून प्रदूषण रोखण्यासाठी आता जनतेनेच पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा-स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी केले.यावेळी डॉ.प्रकाश खांडगे यांच्या 'भंडार बुक्का' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी शाहीर देवानंद माळी यांनी पोवाडा, चंदाबाई तिवाडी यांनी भारुड तर ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी किर्तना व्दारे पर्यावरणविषयक जनजागृतीचा संदेश उपस्थितांना दिला.याप्रसंगी दादा महाराज मनमाडकर,डॉ.प्रकाश खांडगे,कल्याण काळे,प्रकाश पाटील,बाळासाहेब शेळके,संजय भुसकुटे,यांच्यासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे इतर वरीष्ठ अधिकरी उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा