'ग्रामस्वराज्य' च्या निर्मितीमध्ये
पंचायतराज संस्थांची भूमिका महत्वाची -राज्यपाल
मुंबई, दि. 12: ग्राम स्वराज्यच्या निर्मितीमध्ये पंचायतराज संस्थांची भूमिका महत्वाची असून दर्जेदार, पारदर्शक सेवांच्या प्रदानातून आणि लोकाभिमूख प्रशासनातून हे साध्य होईल, असे राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते ‘यशवंत पंचायतराज अभियान’ पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास सचिव सुधीर ठाकरे, कोकण विभागाचे आयुक्त एस.एस.संधु यांच्यासह पंचायतराज संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याने गावांच्या विकासात महिलांचे योगदान अनन्यसाधारण राहणार असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की, यामुळे ग्रामविकासाच्या कार्याला गती मिळेल. ग्रामविकासाच्या अनेक योजना पंचायतराज संस्थांच्या माध्यमातून राबविल्या जात असल्याने त्यांच्या कार्यात दर्जात्मक सुधारणा होणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन पंचायतराज संस्थांचे त्यांच्या कामानुसार अ+ , अ, ब आणि क असे वर्गीकरण केल्याने त्यांच्या कामाचा दर्जा समजण्यास तसेच त्यात सुधारणा घडवून आणण्यास मदत होईल. दारिद्र्य निर्मुलनासाठी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी परिणामकारक होण्याची आवश्यकता असून शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच त्या आदिवासी, मागास आणि दुर्गम भागात पोहोंचवितांना त्यात अधिकाधिक लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले.
गावांपर्यंत समृद्धी आणि प्रगती जावी
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी पंचायतराज संस्थांची निर्मिती आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा महत्वाचा निर्णय यशवंतराव चव्हाणांनी घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 1962 मध्ये राज्यात त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेची निर्मिती झाली. त्यास यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याचे अनेक महत्वाकांक्षी उपक्रम केंद्रीय स्तरावर स्वीकारले जाऊन त्यांची देशभर अंमलबजावणी सुरु झाली असल्याने लोकांच्या अपेक्षा आता ऊंचावल्या आहेत. प्रगती ही फक्त शहरी भागापुरती मर्यादित न राहता विकास, त्यातून निर्माण होणारी समृद्धी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोंचली पाहिजे, त्यादृष्टीने पंचायतराज संस्थांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. नगरांप्रमाणे गावांचे सुक्ष्म नियोजन आराखडे तयार करण्याचा विभागाचा प्रयत्न स्तुत्य आहे. परंतू जी गावे किंवा ग्रामपंचायती विकासाच्या बाबतीत मागे राहिल्या आहेत त्यांच्यासाठी विभागाने विशेष कार्यक्रम राबवावा असे संागून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंचायतराज संस्थांनी वित्तीय प्रशासन, लेखा परिक्षण, स्वच्छता, नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करावी. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामविकास प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे सांगून ते म्हणाले की, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींचे कामकाज दर्जेदार आणि पारदर्शक होणे आवश्यक आहे. यादृष्टीने विभागाने गौरव ग्रामसभा योजना पुढे चालू ठेवावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
ग्रामविकासात लोकसहभाग महत्वाचा असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ग्रामविकासाची कामे अधिक गतिमान पद्धतीने होण्यासाठी विभागाला आवश्यक असलेली पुरेशी आर्थिक
तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. परंतू ही कामे दर्जेदार, पारदर्शक पद्धतीने होणे, त्यात लोकसहभाग असणे आवश्यक आहे. ग्रामसभांच्या बळकटीकरणाला केंद्र आणि राज्य स्तरावर प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींचे काम अधिक पारदर्शक करण्याच्यादृष्टीने विभागाने सुरु केलेली ई टेंडरिंगची कल्पना चांगली असून त्याची परिणामकारकरित्या अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पंचायतराज संस्थांनी केलेल्या कामाच्या मुल्यांकनानुसार विभागाने त्यांची श्रेणीनिश्चिती केली असून ज्या पंचायतराज संस्था ब आणि क वर्गात आहेत त्यांनी त्याची कारणे शोधून काढावीत, त्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्या विभागस्तरावर मांडाव्यात, काम करण्याची मानसिकता बदलावी, असे आवाहन ही त्यांनी याप्रसंगी केले.
यावर्षीपासून एक व्यक्ती दहा झाडे लावण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यानिमित्ताने मोठा सामाजिक बदल घडून आल्याचे सांगून ते म्हणाले की, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत जवळपास 20 हजार गावांनी सहभाग घेतला त्यापैकी 12,193 ग्रामपंचायतींनी योजनेची पहिल्या वर्षीची उद्दिष्ट्ये पूर्ण करून सुमारे 389 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मिळवले. 810 ग्रामपंचायतींनी या योजनेतून अत्युत्कृष्ट काम केल्याने त्यांना पर्यावरण विकास रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले असून ग्रामपंचायती संगणकाच्या माध्यमातून जोडणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. संगणकाच्या माध्यमातून 24 लाख नोंदी झाल्या असून त्यामाध्यमातून 24 हजार कोटी रुपयांचा महसुल पंचायतराज संस्थांमध्ये जमा तर 18 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले की, ई टेंडरिंग, बायोमॅट्रीक्स पद्धतीने हजेरी, ग्रामपंचायतींचे संगणकीकरण असे अनेक महत्वाकांक्षी उपक्रम विभागाने राबविले असून गावात काम करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणेवर ग्रामपंचायतीचा अंकुश राहावा यादृष्टीने त्यांच्या कामाचे मोजमाप करण्याचे आणि त्यावर संबंधित यंत्रणेला अभिप्राय देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात यावेत अशी विभागाची मागणी आहे.
राज्यात राष्ट्रीय जीवन्नोन्नती अभियानांतर्गत 8 ते 10 जिल्ह्यात काम सुरु असून एकात्मिक प्रयत्नातून गुणात्मक विकास घडवून आणण्यासाठी ही योजना तसेच मागास भागासाठी विशेष अनुदान योजना उपयुक्त ठरणार आहे. नुकतीच केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी राज्यातील नगर- सातारा जिल्ह्यातील काही गावांना भेट दिली. महाराष्ट्रात स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि ग्रामविकासाच्याबाबतीत झालेल्या चांगल्या कामांचे त्यांनी विशेष कौत्क केले असून महाराष्ट्राचे प्रोत्साहनात्मक काम घेऊन मी दिल्लीला जात आहे, यातील काही नाविन्यपूर्ण योजना राष्ट्रीय स्तरावर राबविण्याचा आपला मानस आहे, असे गौरवोद्गार श्री. रमेश यांनी काढल्याची माहिती देऊन श्री.पाटील म्हणाले की, यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत राज्यातील 7 जिल्हापरिषदांना अ+, 15 जिल्हापरिषदांना अ, 9 जिल्हापरिषदांना ब तर 2 जिल्हापरिषदांना क श्रेणी मिळाली आहे.
आज राज्यपालांच्या हस्ते सुक्ष्म पद्धतीने करावयाच्या ग्रामविकास आराखड्याचे उद्घाटन करण्यात आले. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर यशवंत पंचायतराज अभियान स्पर्धेत पारितोषिक प्राप्त पंचायतराज संस्था आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गौरव समारंभ पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल ग्रामविकास सचिव सुधीर ठाकरे यांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच, यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास सचिव सुधीर ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
पुरस्कार प्राप्त पंचायतराज संस्था आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचे स्वरूप
जिल्हा परिषद (राज्यस्तर)
1 | जिल्हा परिषद ठाणे. | प्रथम पारितोषिक | रु.25,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
2 | जिल्हा परिषद पुणे | द्वितीय परितोषिक | रु.15,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
3 | जिल्हा परिषद चंद्रपूर | तृतीय पारितोषिक | रु.10,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
पंचायत समिती (राज्यस्तर)
1 | पंचायत समिती भिवंडी, जिल्हा ठाणे | प्रथम पारितोषिक | रु.15,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
2 | पंचायत समिती बारामती , जिल्हा पुणे | द्वितीय परितोषिक | रु.12,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
3 | पंचायत समिती हिंगोली, जिल्हा हिंगोली | तृतीय पारितोषिक (विभागून) | 5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
4 | पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा | | 5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
ग्रामपंचायत (राज्यस्तर)
1 | ग्रामपंचायत पिंगुळी, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग | प्रथम पारितोषिक | 7,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
2 | ग्रामपंचायत बिड सितेपार, ता. मोहाडी, जिल्हा भंडारा. | द्वितीय परितोषिक | 5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
3 | ग्रामपंचायत कांदळी, ता. जुन्नर, जिल्हा पुणे | तृतीय पारितोषिक | 3,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
पंचायत समिती (विभागस्तर)
1 | औरंगाबाद | पंचायत समिती हिंगोली, जिल्हा हिंगोली | प्रथम पारितोषिक | रु.10,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
पंचायत समिती वैजापूर, जिल्हा औरंगाबाद | द्वितीय पारितोषिक | रु.7,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
पंचायत समिती शिरुर अनंतपाळ, जिल्हा लातूर | तृतीय पारितोषिक | रु.5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
2 | पुणे | पंचायत समिती बारामती, जिल्हा पुणे | प्रथम पारितोषिक | रु.10,00,000/-रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
पंचायत समिती गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर | द्वितीय पारितोषिक | रु.7,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
पंचायत समिती राधानगरी, जिल्हा कोल्हापूर | तृतीय पारितोषिक | रु.5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
3 | कोकण | पंचायत समिती भिवंडी, जिल्हा ठाणे | प्रथम पारितोषिक | रु.10,00,000/-रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
पंचायत समिती देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग | द्वितीय पारितोषिक | रु.7,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
पंचायत समिती अलिबाग, जिल्हा रायगड | तृतीय पारितोषिक | रु.5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
4 | नागपूर | पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा | प्रथम पारितोषिक | रु.10,00,000/-रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
पंचायत समिती आमगाव, जिल्हा गोंदिया | द्वितीय पारितोषिक | रु.7,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
पंचायत समिती समुद्रपूर, जिल्हा वर्धा | तृतीय पारितोषिक | रु.5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
5 | नाशिक | पंचायत समिती शेवगाव, जिल्हा अहमदनगर | प्रथम पारितोषिक | रु.10,00,000/-रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
पंचायत समिती संगमनेर, जिल्हा अहमदनगर | द्वितीय पारितोषिक | रु.7,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
पंचायत समिती राहूरी, जिल्हा अहमदनगर | तृतीय पारितोषिक | रु.5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
6 | अमरावती | पंचायत समिती पुसद, जिल्हा यवतमाळ | प्रथम पारितोषिक | रु.10,00,000/-रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
पंचायत समिती दिग्रस, जिल्हा यवतमाळ | द्वितीय पारितोषिक | रु.7,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
पंचायत समिती अचलपूर, जिल्हा अमरावती. | तृतीय पारितोषिक | रु.5,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत् |
ग्रामपंचायती (विभागस्तर)
1 | औरंगाबाद | ग्रामपंचायत नसडगाव, जि. जालना. | प्रथम पारितोषिक | रु.3,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
ग्रामपंचायत झरी , ता. लोहा, जि. नांदेड | द्वितीय पारितोषिक | रु.2,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
ग्रामपं आनंदवाडी ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. | तृतीय पारितोषिक | रु.1,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
2 | पुणे | ग्रामपंचायत कांदळी, ता.जुन्नर , जि. पुणे | प्रथम पारितोषिक | रु.3,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
ग्रामपंचायत नृसिंहवाडी, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर | द्वितीय पारितोषिक | रु.2,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
ग्रामपंचायत आंबवडे, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर | तृतीय पारितोषिक | रु.1,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
3 | कोकण | ग्रामपंचायत पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग | प्रथम पारितोषिक | रु.3,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
ग्रामपंचायत वऱ्हाड- जांभुळपाडा, ता. सुधागड, जि.रायगड | द्वितीय पारितोषिक | रु.2,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
ग्रामपंचायत जालगाव, ता. दापोली, जि. रत्नागिरी | तृतीय पारितोषिक | रु.1,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
4 | नागपूर | ग्रामपंचायत बिड (सितेपार), ता. मोहाडी, जि. भंडारा | प्रथम पारितोषिक | रु.3,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
ग्रामपंचायत आनंदवन, ता. वरोरा, जि. चद्रपूर | द्वितीय पारितोषिक | रु.2,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
ग्रामपंचायत शिवनी मोगरा, ता. लाखनी, जि. भंडारा | तृतीय पारितोषिक | रु.1,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
5 | नाशिक | ग्रामपंचायत चहार्डी, ता.चोपडा,जि. जळगाव | प्रथम पारितोषिक | रु.3,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
ग्रामपंचायत मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर | द्वितीय पारितोषिक | रु.2,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
ग्रामपंचायत शिंदे ता. नाशिक, जि. नाशिक | तृतीय पारितोषिक | रु.1,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
6 | अमरावती | ग्रामपंचायत श्रीरामपूर ता. पुसद, जि.यवतमाळ | प्रथम पारितोषिक | रु.3,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
ग्रामपंचायत देवगाव, ता.अचलपूर जि. अमरावती | द्वितीय पारितोषिक | रु.2,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र | ||
ग्रामपंचायत यावली शहिद ता.अमरावती, जि. अमरावती | तृतीय पारितोषिक | रु.1,00,000/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा