सचिनने देशाचे नाव संपूर्ण विश्वात उंचावले
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई दि. 16- महाराष्ट्राच्या मातीतील एका खेळाडूने तब्बल 22 वर्ष जगभरातील क्रीडा विश्वावर अधिराज्य गाजवीत आज आपल्या महाशतकी कामगिरीमुळे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव संपूर्ण विश्वात उंचावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकावर प्रतिक्रिया दिली आहे.
जगातील जवळजवळ सर्वच मैदानावर आपल्या सर्वोत्तम आणि परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या तेंडुलकर यांने कसोटी आणि एक दिवसीय या दोन्ही प्रकारात 29 हजार धावा करुन जगात प्रथम क्रमांकावर आहे. दोन्ही प्रकारात सर्वाधिक शतके, सर्वाधिक अर्धशतके आणि विश्वचषक स्पर्धांचा विचार करता एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम, एकदिवशीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार आणि सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार तसेच एक दिवशीय सामन्यात कॅलेंडर वर्षात एक हजार पेक्षा जास्त धावा काढण्याची सर्वाधिक वेळी केलेल्या कामगिरीमुळे त्याने भारताबरोबर महाराष्ट्राचेही नाव उज्वल केले आहे. आपल्या असामान्य खेळाने, अनेक विक्रम करीत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य निर्माण केले आहे. सचिन यांने आपल्या झंझावती, वेगवान खेळीने अनेक वेळेला भारतीय संघाला पराभवापासून सावरले आहे, असंख्य वेळा विजयी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा