शनिवार, ३ मार्च, २०१२

प्रेस कॉन्सिलची राज्य सरकारला दिलेली
कारणे दाखवा’ नोटीस मागे
न्या.काटजू यांची माहिती
मुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील पत्रकारांच्या हल्ल्यासंदर्भात राज्य सरकार करीत असलेल्या कार्यवाहीची संपूर्ण माहिती विस्तृतपणे देणार असल्याचे सांगितले आहे.  मुख्यमंत्र्यांनी तसे पत्र आपल्याला लिहिले असून ते कृती करतील यावर माझा विश्वास आहे.  मुख्यमंत्री हे जेंटलमॅन असून त्यांच्या कृतीने आपले समाधान झाले आहे त्यामुळे आपण राज्य सरकारला याविषयावरून दिलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेत असल्याचे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे न्या.मार्कंडेय काटजू यांनी काल नवी दिल्ली येथे पत्रकारांना दिली. 
न्या.काटजू यांची राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली येथे भेट घेऊन राज्यातील पत्रकारांच्या हल्ल्याविषयी निवेदन दिले होते.  त्यावर न्या.काटजू यांनी 22 फेब्रुवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्य सरकार काय कार्यवाही करीत आहे याचा तपशील तीन आठवड्यात देण्यात सांगितले होते.  याशिवाय या विषयावरून राज्य सरकार बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतीना का करण्यात येऊ नये अशी विचारणाही या पत्रात केली होती.
मुख्यमंत्र्यांनी न्या.काटजू यांना 24 फेब्रुवारी रोजी पत्र लिहून आतापर्यंत राज्य सरकारने केलेल्या कार्यवाहीचा तपशील ही सादर केला.  याशिवाय न्या.काटजू यांच्या पत्रातील मुद्यांच्या अनुषंगाने अधिक तपशील व विस्तृत वस्तुस्थिती लवकरात लवकर देण्यात येईल असे कळविले होते.
काल न्या.काटजू यांनी मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर समाधान व्यक्त करेल, आपली कारणे दाखवा नोटीस मागे घेत असल्याचे दिल्ली येथील माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
-----00-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा