जागृत समाजाच्या निर्मितीसाठी स्त्री शिक्षणाला अधिक महत्व
- राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील
नंदुरबार, दि.24 :- जागृत समाजाच्या निर्मितीसाठी स्त्री शिक्षणाला अधिक महत्व असून सामाजीक विकास व राष्ट्र बांधणीच्या कार्यात स्त्रीयांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचें प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी नंदुरबार येथे जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात बोलतांना केले. यावेळी त्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन नंदुरबार तालुका विधायक सिमितीच्या सुवर्ण महोत्सवांचा शुभारंभ करण्यात आला.
राष्ट्रपती श्रीमती पाटील पुढे म्हणाल्या की, स्त्री- पुरुष हे समाज रथाचे दोन चाके असून त्यातील एक चाक शिक्षणाअभावी कमकुवत असलेले चालणार नाही. त्याकरिता देशातील प्रत्येक मुला-मुलींना शिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच शिक्षण हे अंंधारातून बाहेर पडण्याचा प्रकाशमय मार्ग असल्याने आदिवासी बांधवांना शिक्षण देऊन सबल केल्याशिवाय भारत बलवान राष्ट्र बनू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या जगात भारत हा ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे, ज्ञान हीच शक्ती असल्याने प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळणे आवश्यक असून घरांघरामध्ये ज्ञानार्जन झाले पाहिजे. त्यासाठी देशात 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींकरिता मोफत प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. असे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले तसेच.भारत माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून यापुढेही राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
. नंदुंरबार तालुका विधायक समितीचा उद्देश ग्रामीण व आदिवासी कुटूंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. या संस्थेत 70 टक्के विद्यार्थी आदिवासी समुदायातील आहेत ,ही फार प्रशंंसनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वर्गीय गजमल तुळशिराम पाटील, स्व.जी.एस.मराठे आणि बटेसिंह रघवुंशी या त्रयींच्या दूरदृष्टीतून या संस्थेची स्थापना 1961 मध्ये झाली. आज या संंस्थेने चंागली प्रगती केली असून संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने त्यांच्या भावी वाटचालीस राष्ट्पती पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी सौ. विमलताई बटेसिंग रंघुवंशी यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुष्प गुच्छ, शाल, आदिवासी दागिने व आदिवासी मुकूट देवून सत्कार करण्यात आला. तर मा. मुख्यमंत्री ना. चव्हाण व ना. बाळासाहेब थोरात यांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
बदलत्या काळात विज्ञाननिष्ठ शिक्षणाची गरज :- मा.मुख्यमंत्री ना.चव्हाण
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, आदिवासी भागात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीने शैक्षणिक संस्थाचे जाळे उभारुन आदिवासी बांधवांना मोठया प्रमाणात शिक्षणाच्या पायाभूत सोयी उपलब्ध करुन दिल्या असून संस्था शैक्षणिक दृष्टया विकासाकडे वाटचाल करीत आहे. ते पुढे म्हणाले की, बदलत्या काळानुरुप विज्ञाननिष्ठ शिक्षणाची आवश्यकता असून शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचे काम या संस्थेमार्फत केले जात असून संस्था सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ना. चव्हाण म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थितीतही नंदुरबार तालुका विधायक समितीने जोमाने कार्य करुन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहा पासून दूर असलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसाने पाऊल टाकले असून या संस्थेत 23 हजार विद्यार्थी विद्यार्जन करीत असून संस्थेच्या 64 शाखा कार्यरत असून परराज्यातही संस्थेने आपल्या शैक्षणिक संस्थांची जाळे उभारण्यास सुरुवात केलेली आहे. संस्थेच्या या शैक्षणिक कार्याची समाजाला गरज असून त्यांचे हे कार्य शासनाच्या कार्याला पुरक असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, नंदुूरबार जिल्हयाचे पालकमंत्री ऍ़ड. पद्माकर वळवी, खासदार माणिकराव गावीत, माजीमंत्री सुरुपसिंग नाईक, संस्थेचे चेअरमन बटेसिंह रघुवंशी, श्रीमती विमलताई रघुवंशी व माजी. आ. चंद्रकांत रघुवंशी आदि उपस्थित होते.
भारताचे अतिरीक्त महाधिवक्ता तथा सुवर्ण महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक ऍ़ड. राजेंद्र रघुवंशी यांनी प्रस्ताविक केले. तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आभार मानले.
**************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा