सोमवार, ३० जानेवारी, २०१२

संदेश संखे यांनी पुर्ण केली 21 किलोमीटरची मॅराथॉन

हार्दिक अभिनंदन !  त्रिवार अभिनंदन !
श्री. संदेश संखे, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय
(स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅराथॉन स्पर्धा पूर्ण)
मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी श्री. संदेश संखे यांनी दि. 15 जानेवारी 2012 रोजी मुंबईत झालेल्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड मॅराथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन 21 किलोमीटरची स्पर्धा 2 तास 36 मिनिटे 44 सेकंद या वेळेत पूर्ण केली. आयोजकांच्यावतीने त्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. श्री. संखे हे उत्साही व मनमिळाऊ कर्मचारी असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सहकाऱ्यांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्यांनी गेला महिनाभर रोज आठ किलोमीटर पळण्याचा सराव केला. श्री. संखे यांचे मन:पुर्वक अभिनंदन.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा