कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी
दहा हजार कोटीचा विशेष कार्यक्रम - मुख्यमंत्री
* डॉ. पंजाबराव देशमुख यांची 113 व्या जयंती उत्सवाला सुरुवात
* शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासोबत गुणवत्ता वाढीसाठी विशेष कार्यक्रम
* पारदर्शक प्रशासन देणार
* जलसिंचनाच्या नवीन तत्वाच्या वापरास प्राधान्य
अमरावती, 27 विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे, तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्चाचा विशेष आराखडा तयार करण्यात येत असून पाच वर्षात सिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ करण्यासोबतच कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली.
कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम तयार करतांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शेतीविषयक विचारांचाही यात समावेश करुन हा कार्यक्रम अमरावती विभागात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहिर केले.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 113 व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अरुणकुमार शेळके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे , महापौर ॲड. किशोर शेळके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार रावसाहेब शेखावत, प्रा. विरेंद्र जगताप, ॲड. यशोमती ठाकुर, वसंतराव खोटरे आदी उपस्थित होते.
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी प्रतिकुल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील अत्यंत गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण संस्था सुरु करुन त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांचे दु:ख, सिंचनाचा बॅकलॉग, कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती आणि यावर मार्ग काढण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केलेले कार्य महत्वपूर्ण असून त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याचा कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी लाभ होणार आहे. नैसर्गिक परिस्थितीमुळे सिंचनाच्या सुविधा निर्माण करतांना जलसिंचनाच्या नवीन तत्वाचा वापर करुन उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा ठिंबक व तुषार पध्दतीने कसा जास्तीत जास्त वापर करता येईल याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विदर्भातील शेतकऱ्यांसमोर अनियमित पावसामुळे सोयाबिन व कापसाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे शासनाने दोन हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना मदतीचे धोरण स्वीकारले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या मदतीमुळे संपूर्ण नुकसान भरपाई होत नसली तरी सिंचन क्षमता वाढविणे तसेच शेतीला जोडधंदा निर्माण करण्यासाठी सहाय्य होणार आहे. पावसावर विसंबून असलेली शेती, चांगल्या बियाणांचा अभाव यासोबतच उत्पादन खर्च वाढत असतांना शेती अधिक किफायतशिर व्हावी व शेतकरी अडचणीतून बाहेर यावा यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची पुनरावृत्ती करुन त्यांच्या शेती सुधारणेच्या संकल्पना स्वीकारण्याची आवश्यकता यावेळी त्यांनी व्यक्त केली.
विदर्भातील उद्योगाला चालना देऊन दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच विभागीय असमतोल दूर करण्याला प्राधान्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विविध क्षेत्रातील असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी डॉ. विजय केळकर यांची समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीच्या शिफारशीनुसार असमतोल दूर करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शेतीवर विसंबुन न राहता उद्योग सुरु करावे तसेच व्यवसायिक शिक्षणाकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
..2..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा