शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

महाराष्ट्र अग्रभागी



"इंडिया टुडे "  आयोजि मुख्यमंत्री परिषदेत महाराष्ट्र अग्रभागी


नवी दिल्ली, दि. 4 नोव्हेंबर : इंडिया टुडे ग्रुपतर्फे आयोजि देशातील सर्व राज्यांच्या प्रगती आलेखावर आधारीत मुख्यमंत्री परिषदेमध्ये शुक्रवारी महाराष्ट्र गुजरात राज्याला संयुक्तरित्या  देशातील सवोर्त्तम गुणवत्त्तापूर्ण राज्य म्हणुन गौरविण्यात आले.
        येथील हयात हॉटेलमध्ये आयोजि कार्यक्रमात केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा सवोर्च्च मानाचा पुरस्कार स्विकारला. महाराष्ट्राच्ला बचत क्षेत्रात उत्तम कामगिरी  केल्याबद्दलही मॅक्रो इकोनॉमीसाठीही स्वतंत्र पुरस्कार देवुन गौरविण्यात आले.
        तत्पुर्वी मुख्यमंत्र्याच्या परिषदेमध्ये पृथ्वीराज चव्हाण केंद्राकडून राज्यशासनांना त्यांचा न्याय्य देय निधी मिळाला पाहिजे. ही बाब त्यांनी अत्यंत ठामपणे तर्कसंगत पद्धतीने मांडली. राज्यांचा त्या अनुषंगाने देशाच्या विकासदरात सातत्य राखणे तसेच तो उंचावला जाणे अपेक्षीत आहे. मात्र हे आव्हान  पेलण्यासाठी काही महत्त्वपुर्ण बाबींवर केंद्रशासनाने लक्ष केंद्रीत करण्याचे राज्यांना सक्षम बनविण्यासाठी पाऊले उचलण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        ते पुढे म्हणालेत की राज्य आणि केंद्राच्या महसूल गोळा करण्यात असमतोल असून राज्याकडून केंद्राला प्राप्त झालेला महसूल राज्याच्या विकासाकरीता योग्य प्रमाणात मिळत नाही. राज्यांना मिळणाऱ्या असमतोल महसुलीचा वाटा वाढावा यासाठी केंद्राला समीक्षा करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. विकेंद्रीकरण आणि शहरीकरणाची गती वाढविण्यामध्ये स्थानीक शासनाच्या  वित्तीय अथर्संकल्पामध्ये वाढ झाली आहे. परंतू याठिकाणी मानवी अवमुल्यन आथिर्क संसाधनाचे जबाबदारी घेणारी यंत्रणा सशक्त बनविणे महत्वाचे असल्याचेही  ते म्हणाले.
        पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी महाराष्ट्राने नेहमीच अग्रक्रमांक पटकाविला  आहे, मात्र तो तसाच कायम  राखण्याची खरी कसोटी आहे. इंडिया टुडे ग्रुपने राज्याच्या कारभाराची मिमांसा करून पुरस्कृत केल्याबद्दल त्यांनी इंडिया टुडे ग्रुपला  धन्यवाद दिले. राज्य शासनासमोर कृषि, आरोग्य, सिंचन, पायाभूत सुविधा, शिक्षण, वीज सुरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये आव्हाने उभी आहेत परंतू सध्याचे आघाडी सरकार आपल्या कार्यकाळातच त्या आव्हानांवर मात करेल आणि राज्यातील जनतेला समृध्दीच्या पायावर उभं करेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त रत राज्याला सवोर्च्च बहुमान मिळाल्याबद्दल राज्यातील जनतेला, मंत्रीमंडळला, प्रशासनला, सर्वच अधिकारी-कर्मचारी वर्गाला धन्यवाद दिले.


00000



                                                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा