सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी
कॉलसेंटरच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 20 : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी त्वरित सोडविल्या जाव्यात यासाठी आम्ही कॉलसेंटरच्या माध्यमातून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिली.
सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता तयार करण्यात आलेल्या हौसिंग मन्युअलचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हौसिंग मॅन्युअल पुस्तिका व सिडीचे प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात 85, 335 गृहनिर्माण संस्था आहेत. या हौसिंग मॅन्युअलमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी, सभासदत्व, सभासदांचे हक्क व जबाबदाऱ्या, व्यवस्थापन समितीचे कामकाज, लेखा परिक्षण, एकतर्फी हस्तांतरण, इमारतींचा पुनर्विकास या मुद्यांचा समावेश केला आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हे हौसिंग मॅन्युअल परिपूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून सहकारी चळवळीतील कार्यकर्ते, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासद, सर्व सामान्य नागरिक, हौसिंग फेडरेशनचे प्रतिनिधी यांच्याकडून मते मागविण्यात आली होती. संकेतस्थळावरही मसुदा उपलब्ध करुन देण्यात आला होता. सहकारी संस्थांच्या कामाचा दर्जा वाढवून सभासदांच्या तक्रारी कमी होण्यास या मॅन्युअलची मदत होणार आहे.सभासदांनी आपल्या तक्रारींबाबत कोणत्या यंत्रणेकडे संपर्क साधला पाहीजे याबाबत मार्गदर्शन मॅन्युअलमध्ये करण्यात आले आहे.हे मॅन्युअल पुस्तक व सिडीच्या रुपात प्रकाशित करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
गृहनिर्माण प्राधिकरण लवकरच निर्माण होणार आहे, असे सांगून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आतापर्यंत 350 डीम्ड कन्व्हेअन्स झालेले असून सहकार विभागातील क व ड वर्गातील रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत श्रेणी अ अधिकारी हे पद भरण्यात येणार आहेत. गेल्या 2 ते 3 महिन्यात चेंबूर, कांदीवली व बोरीवली येथे हौसिंग दरबार घेतले व मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मुंबईत विभागीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.1960मध्ये तयार करण्यात आलेल्या सहकार कायद्यात अमुलाग्र बदल करण्यासाठी लवकरच समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्री.पाटील यांनी दिली.
यावेळी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, सहकार आयुक्त मधूकर चौधरी, सहकार सचिव राजगोपाल देवरा, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
0 0 0 0
प्रसिध्द केलेले, हौसिंग मॅन्युअल पुस्तिका व सिडी कुठे मिळेल ?
उत्तर द्याहटवाjadhavsurya@gmail.com