कागल तालुक्यातील हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालका सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी डावीकडून माजी मंत्री प्रकाश आवाडे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, खासदार सदाशिवराव मंडलिक, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार माणिकराव ठाकरे, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार महादेवराव महाडीक आदी.
मंडलिक कारखान्याच्या गळीत हंगामाचा
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर दि. 21 : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज झाला.
कागल तालुक्यातील हमिदवाडा-कौलगे येथे असलेल्या या कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला.
यावेळी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार जयवंतराव आवळे, आमदार रमेश बागवे, आमदार महादेवराव महाडिक आदी उपस्थित होते.
कागल तालुक्यातील हमिदवाडा येथील सहविजनिर्मिती प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाचा प्रारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. समवेत वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, खासदार सदाशिवराव मंडलिक, आमदार माणिकराव ठाकरे, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजीमंत्री प्रकाश आवाडे आदी.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा