श्रीरामपूर नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्राचे
मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन
श्रीरामपूर, दि. 30:- श्रीरामपूर नगर परिषदेच्या संगणक प्रणालीच्या अंमलबजावणीकरीता तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा केंद्राचे उद् घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
या समारंभास वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष जयंतराव ससाणे, जिल्हाधिकारी संजीव कुमार, आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष मंदाताई कांबळे, पक्ष प्रतोद सौ. राजश्री ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत त्यांच्या वेळेची बचत व्हावी या दृष्टिने जास्तीत जास्त पारदर्शी सेवा देण्याचा नगर परिषदेचा उद्देश या केंद्रामुळे सफल होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी नागरी सुविधा केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले. नागरी सुविधा केंद्राची पाहणी करुन देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. या नागरी सुविधा केंद्रात ऑनलाईन संगणकीय सेवा सुरु केल्यामुळे सर्व प्रशासकीय कामकाज संगणकावर होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात गती येणार आहे. नागरिकांची कामे कमी वेळेत पूर्ण करणे कर्मचाऱ्यांवर बंधनकारक आहे.
श्रीरामपूर शहरवासियांना विविध स्वरुपाच्या मुलभूत सेवा पुरविणारी राज्यातील एकमेव नगर परिषद आहे. या केंद्रामार्फत नगर पालिकेकडे येणा-या सर्व प्रकारचे टपाल, अर्ज, निवेदने त्यांची प्रणाली मध्ये नोंद होऊन त्यावरील संपूर्ण कार्यवाही बाबत पाठपुरावा होइल. नागरिकांच्या विविध स्वरुपांच्या तक्रारींचीही नोंद प्रणालीमध्ये करण्यात येईल. तक्रार निवारणासाठी संबंधित विभागाना पाठविणे, जन्म, मृत्यू दाखले, विविध विभागामार्फत देण्यात येणा-या सुविधांच्या प्रतिंचे वितरण, बिल भरणा मदत कक्ष व प्रपत्राची विक्री आदीची सोय आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा